पुणे : बहुजननामा ऑनलाईन – एटीएमला पैसे काढण्यास गेल्यानंतर येथे असलेल्या तरुणाने हातचलाकी करून महिलेचे एटीएम कार्ड घेऊन त्याद्वारे 15 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
स्वप्नील वसंत ललवाणी (वय 32, काळेपडळ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 58 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ( Hadapsar Police) ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या हांडेवाडी भागात राहतात.
त्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यास गेल्या होत्या.
यावेळी येथे एक तरुण होता. त्याने या एटीएममध्ये पैसे नाहीत, आपण दुसऱ्या एटीएममधून पैसे काढू, असे म्हणून तयाना खोटी माहिती दिली.
त्यानंतर दोघे आर्यन सेंटर वैभव थियेटर जवळील एका एटीएलला पैसे काढण्यास गेले.
त्यावेळी आरोपीने त्या पैसे काढत असताना त्यांचा पिन चोरून पहिला यानंतर त्यांचीशी बोलत बोलत त्यांचे एटीएम कार्ड घेतले.
त्यांना दुसरेच बनावट एटीएम दिले यानंतर त्यांच्या खात्यातून 15 हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली आहे.
दरम्यान काही दिवसांनी फिर्यादी यांना घरी गेल्यानंतर एटीएम पाहून शंका आली.
त्यावेळी त्या पैसे काढण्यास एटीएमला गेल्या त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र पैसे निघाले नाही यानंतर त्यांना लक्षात आले.
याच दरम्यान त्यांना आरोपी एका ठिकाणी दिसला त्यांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले व घडलेला प्रकार सांगितला.
अधिक तपास हडपसर पोलीस (Hadapsar Police) करत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट
मेडिसिन होर्डिंग केसमध्ये गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी, ड्रग कंट्रोलरने HC ला दिला रिपोर्ट
कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर शरीरात कमजोरी असेल तर करा ‘हे’ 7 उपचार; जाणून घ्या
6 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह, माहेरच्यांनी केला घातपाताचा आरोप
शिक्षकांसाठी खुशखबर ! TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय, आयुष्यभर राहणार प्रमाणपत्राची वैधता