वाराणसी : वृत्तसंस्था – Gyanvapi Mosque Case | वाराणसीतील ज्ञानवापी-शृंगार गौरी प्रकरणाचा (Gyanvapi Mosque Case) निकाल देताना या प्रकरणातील हिंदू पक्षकरांची याचिका कोर्टात स्वीकारण्यात आली. ज्ञानवापी खटल्याचा निकाल देताना जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश (District Judge A.K. Vishwesh) यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने (Bench) हा खटला कायम ठेवण्यायोग्य असल्याचे मानले. यावेळी मुस्लीम (Muslim) बाजूची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि खटल्याची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणावर (Gyanvapi Mosque Case) जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणी (Gyanvapi Sringar Gauri case) निकाल देताना कोर्टानं म्हटलं की, या वादावर सुनावणी केली जाईल. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 तारखेला होणार आहे. न्यायालयाने सांगितले की, राखी सिंह (Rakhi Singh) विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य (Uttar Pradesh State) केस न्यायालयात चालविण्यास योग्य आहे. असा निर्णय देताना प्रतिवादी अंजुमन इनजतिया मशीद कमीटीचा (Anjuman Injatia Masjid Committee) अर्ज कोर्टानं फेटाळला आहे.
Uttar Pradesh | The court rejected the Muslim side's petition and said the suit is maintainable. The next hearing of the case is on Sep 22: Advocate Vishnu Shankar Jain, representing the Hindu side in the Gyanvapi mosque case pic.twitter.com/EYqF3nxRlT
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 12, 2022
जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश (District Judge Ajay Krishna Vishvesh) यांनी हा निकाल दिला. यावेळी हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन (Harishankar Jain) आणि विष्णू जैन (Vishnu Jain) यावेळी उपस्थित होते. याशिवाय लक्ष्मी देवी (Lakshmi Devi), रेखा आर्या (Rekha Arya) आणि मंजू व्यास (Manju Vyas) या 5 पैकी 3 फिर्यादी देखील कोर्टात पोहोचल्या होत्या. केवळ 40 पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना या सुनावणीवेळी प्रवेश मिळाला होता. इतर लोकांना कोर्टामध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
#WATCH | Varanasi, UP: "Bharat is happy today, my Hindu brothers & sisters should light diyas to celebrate," says petitioner from Hindu side Manju Vyas as she dances & celebrates the Gyanvapi Shringar Gauri verdict pic.twitter.com/hO7frpErNF
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 12, 2022
हिंदू पक्षाचा दावा
16 व्या शतकात मुघल शासक औरंगजेबाने मंदिर तोडून मशीद बांधली होती. तर मुस्लीम बाजूचे म्हणणे आहे की तेथे आधीपासूनच मशीद होती, मंदिर पाडले गेलेले नाही. त्यानंतर 7.11 नियमान्वये झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूंनी अनेक दावे मांडले. या प्रकरणात पूजा कायदा लागू होत नाही, असे हिंदू बाजूचे म्हणणे आहे. तर मुस्लीम पक्षाचे म्हणणे आहे की मशिदीला उपासना कायद्यांतर्गत संरक्षण असावे.
#BREAKING [Gyanvapi-Kashi Vishwanath dispute] Suit filed by Hindu parties seeking worship rights is maintainable: Varanasi Court #GyanvapiMosque #GyanvapiVerdict #GyanvapiCase#Gyanvapi https://t.co/bygwXQacNF
— Bar & Bench (@barandbench) September 12, 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आमच्या बाजूने निकाल लागला नाही तर…- मुस्लीम पक्षकार
ज्ञानवापी वरील निकालाबाबत मुस्लीम पक्षाचे वकील मोहम्मद तौहीद (Lawyer Mohammad Tawheed) म्हणाले की,
निर्णय त्यांच्या बाजून आला नाही तर उच्च न्यायालयाचे (High Court) दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत.
आणि जर न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने आला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ.
Web Title :- Gyanvapi Mosque Case | judge ak vishvesh delivering verdict gyanvapi shrinagar gauri dispute case holds case maintainable Gyanvapi Mosque Case verdict
हे देखील वाचा :
Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार