बहुजननामा ऑनलाईन – हरियाणा येथील गुरुग्राम शॉपिंग मॉलमध्ये पोलिसांनी छापा टाकून तेथे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी येथील स्पा सेंटरवर छापे टाकून २ तरुणी, १५ महिला, ७ ग्राहक आणि स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण पालम विहार पोलिस स्टेशन परिसरात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु होते. याविषयी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती, त्या आधारे त्यांनी ही कारवाई केली.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पालम विहार ठाणे पोलिस कृष्णा हे चौकात गस्त घालत होते. तेव्हा त्यांना एका व्यक्तीने माहिती दिली की, अंसल प्लाझा शॉपिंग मॉलमधील अवलोन स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय केला जात आहे. स्पा सेंटरवर छापा टाकण्यापूर्वी पोलिसांनी बोगस ग्राहक म्हणून आपल्या एका सहकाऱ्याला तिथे पाठविले आणि हा प्रकार खरा असल्याचे समजताच पोलिसांच्या पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला आणि त्याचे मॅनेजर निरंजन आणि स्पा सेंटर ऑपरेटर आलोकचा साथीदार याला अटक केली. स्पा सेंटरचा दुसरा साथीदार गौरव हा मात्र त्यांना तिथे सापडला नाही.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्या दरम्यान पोलिस पथकाने १५ महिला, २ तरुणी आणि ७ ग्राहकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मुली दिल्ली, तामिळनाडू, मिझोरम, मणिपूर, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि तेलंगणा येथील आहेत. हे सर्व जण दिल्ली आणि गुरुग्राम येथे राहत होते. सहायक पोलिस आयुक्त उद्योग विहार बिराम सिंह म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरु आहे.