नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘सॉरी मम्मी डॅडी’ मी जीएसटी भरू शकलो नाही, म्हणून मी हे जग सोडून जात आहे, मला माफ करा. अशी चिट्ठी लिहीत एका अकाउंटंटने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पंजाबमधील गुरुदासपूर येथील सतिंदर यांनी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. अविवाहित सतिंदर हे अकाउंटंटचे काम करत असत.
जीएसटी आल्यानंतर ते जीएसटीचे काम करत असत. त्यांनी ही रक्कम भरण्यासाठी ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, ते त्यांनी खर्च करून टाकले. यामुळे त्यांच्यावर दबाव वाढल्याने त्यांनी आत्महत्यांचे पाऊल उचलले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती मिळाल्यानंतर आम्हीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तपासात ही माहिती समोर आली.
त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला असून तो वैद्यकीय तपासणीसाठी पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच मृतकाचे नातेवाईक आले असून पोस्टमोर्टमननंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जाणार असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.
Visit : bahujannama.com