बारामती : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak Attack Case) या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज कर्मचारी निषेध रॅली काढण्यात आली.
यानंतर कामगार नेत्यांनी (Labour Leaders) संतप्त भावना व्यक्त केल्या.
बारामती टेक्स्टाईल पार्कचे (Baramati Textile Park) कामगार तुकाराम चौधर (Worker Leader Tukaram Chaudhar)
यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) याची जिभ हासडेल (Tongue Cutter) त्याला मी माझ्या वतीने 11 लाख रुपयांचे बक्षीस देईल.
तसेच जी कामगार महिला त्या गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) च्या हातात बांगड्या भरेल तिला मी 5 लाख रुपये बक्षीस देईन अशी घोषणा चौधर यांनी केली.
चौधर पुढे म्हणाले, गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हा माणूस विविध कामगार संघटनांमध्ये शिरुन कामगारां पुढे संकट निर्माण करण्याचे काम करत आहे.
त्यामधूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला.
12 एप्रिल रोजी सदावर्ते म्हणाले होते बारामतीमध्ये पवारांच्या घरासमोर आंदोलन (Agitation) करु.
मात्र सदावर्ते व त्यांच्या मनोवृत्तीच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो तुम्ही बारामती मध्ये येऊन तर पाहा आम्ही त्यांची वाटच पाहात आहोत,
असा इशारा यावेळी दिला.
भविष्यात सदावर्तेच काय पण त्या मनोवृत्तीच्या लोकांनी बारामतीत पाऊल टाकले तर त्याची जीभ हासडणाऱ्यास रोख 11 लाखाचे बक्षीस देण्यात येईल.
त्यांच्या हातात बांगड्या भरणाऱ्या महिलेला 5 लाख आणि तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजारांचे बक्षीस दिले जाईल असेही चौधर म्हणाले.
Web Title :- Gunaratna Sadavarte | gunaratna sadavarte tongue lashing prize of rs 11 lakh announcement of Baramati Textile Park of trade unions in baramati of pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update