मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– मागील आठवड्यापासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असल्याने राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा (Shiv Sena rebel MLA) मागील काही दिवसांपासून खासदार संजय राऊत खरपूस समाचार घेत आहेत. यावर बंडखोर आमदारांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. काल सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यानंतर आज गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना जुन्या आठवणी सांगत त्यांच्यावर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी टीका केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एकनाथ शिंदे (Eknath Shinde), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केली आहे. यावरुन संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यामुळे बंडखोर आमदार आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. गुवाहाटी येथून निघताना शेवटच्या बैठकीत गुलाबराव पाटील यांचा व्हिडीओ समोर आला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील ?
ज्या वेळेस मैदान येईल त्यावेळी आम्ही त्यांना काही आहोत हे सिद्ध करुन दाखवू, मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडली ‘मातोश्री’ वर गेले,
आमच्यासारख्या 52 आमदारांना सोडलं पण त्यांनी आमच्यासाठी शरद पवारांना (Sharad Pawar) सोडलं नाही.
आम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही त्यांनी सांगावं. आमची परिस्थिती नव्हती आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून शिवसेनेसाठी लढा दिला.
आम्हाला त्यांच्या आशिर्वादाने मिळाले मात्र आमचाही त्यात काहीतरी वाटा आहे.
हे त्यांनी विसरु नये, आम्ही आयत्या बिळावर नागोबा नाही. अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
तसेच संजय राऊत यांच्या समाचार घेतला,
ते म्हणाले मी टपरीवाला आहे त्यांना माहिती नाही चुना कसा लावतात जेव्हा वेळ येईल त्यावेळी त्यांना मी सांगेन चुना कसा लावायचा असतो.
अशी टीका संजय राऊतांवर गुलाबराव पाटील यांनी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update