Gulabrao Patil | ‘तेच ते बोलून आम्हाला छळण्यापेक्षा नव्याने पक्ष बांधणी करा’, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सल्ला

Gulabrao Patil | instead of torturing us by saying the same thing build a new party gulabrao patil s reaction to aditya thackerays claim regarding eknath shinde revolt

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – आमच्या बंडाला आणि उठावाला आता नऊ महिने होऊन गेलेत. किती दिवस एकच विषय लावून आम्हाला छळण्यापेक्षा आता नव्याने पक्षबांधणी करुन सरकार कसं येईल याचा विचार करा, असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाबाबत आदित्य ठाकरे यांना गौप्यस्फोट केला होता. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. ते जळगावमध्ये बोलत होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil) म्हणाले, आमच्या बंडला आणि उठावाला आता नऊ महिने होऊन गेले आहेत. किती दिवस एकच विषय लावून आम्हाला छळणार आहात? तेच तेच बोलण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नाही. आता राज्याचे काही बघणार की नाही? एखाद्या घरात तरुणाचा मृत्यू झाला तरी काही दिवसात लोक ते विसरण्याचा प्रयत्न करतात. तुम्हीही आम्हाला आता विसरा. खरंतर आता पक्षबांधणी करुन नव्याने सरकार कसं येईल याचा विचार केला पाहिजे. यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तेच तेच पाहून आता लोकही कंटाळले आहेत, टीव्ही देखील पाहत नाहीत, असे पाटील यांनी म्हटले.

 

 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद दौऱ्यावर असताना गीतम विद्यापीठाच्या (Geetham University) कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेतील (Shivsena) फूट आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर (Matoshree) आले होते. ते रडायला लागले आणि म्हणाले की भाजपसोबत (BJP)  हातमिळवणी करा अन्यथा ते आम्हाला जेलमध्ये टाकतील. मी भाजपसोबत नाही गेलो तर तुरुंगात जाईन, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Gulabrao Patil | instead of torturing us by saying the same thing build a new party gulabrao patil s reaction to aditya thackerays claim regarding eknath shinde revolt

 

हे देखील वाचा :

Uric Acid | एक्सपर्टकडून जाणून घ्या, यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास काय खावे आणि काय नाही

Pune Crime News | आमच्या गल्लीत का आलास असे म्हणून गुंडाने डोक्यात फोडली बिअरची बाटली

Summer Desserts | उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतील देशी मिठाईचे हे 5 प्रकार, तुम्ही ट्राय केले का?