मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यात वाद सुरु आहेत. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन 50 कोटी रुपये घेऊन शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी देखील त्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेपर्यंत पुरावे देण्याचे आव्हान केले आहे. त्यांच्या या वादात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाष्य केले आहे. रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) म्हणाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दोनही नेत्यांनी शांततेने घेणे गरजेचे आहे. दोघांनाही समज असली पाहिजे. ही समज घालण्याचे अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आहेत. त्यामुळे ते दोघांना समज देतील, अशी मला आशा आहे. या वादावर लवकरात लवकर पडदा पाडला पाहिजे. एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सर्व आमदारांवर आरोप करण्यासारखे आहे. त्यामुळे रवी राणा यांचे आरोप चुकीचे आहेत. त्यांनी आपले शब्द मागे घेतले पाहिजेत. कोणीही बिकाऊ नाही. त्यांनी जर तसे केले नाही, तर जनमाणसांत संभ्रम निर्माण होईल. सर्व आमदारांनी आपल्या आयुष्याची चाळीस वर्षे पणाला लावली आहेत. सर्वांनी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली आहे. त्यामुळे राणा यांनी स्वत:ला आवर घालावा.
ठाकरे गटातील अनेक आमदारांच्या आणि नेत्यांच्या सुरक्षा काढून घेण्यात आल्या आहेत.
त्यावरुन शिंदे सरकारवर टीका होत आहे. त्यावर गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे.
सुरक्षेच्या मुद्यावरुन कोणी राजकारण करत नाही. एखाद्याची सुरक्षा काढल्याने कोणालाही आनंद होत नाही.
सुरक्षेचे निर्णय सुरक्षा समिती घेत असते. कोणत्याही नेत्याची सुरक्षा काढण्याला सरकारला स्वारस्य नाही, असे पाटील यांनी सांगितले.
कडू राणा यांच्यातील वादावर आता उपाय काढण्याचे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आहे,
असेच सर्व आमदारांचे आणि नेत्यांचे मत आहे.
कडू यांनी 1 नोव्हेंबरला आपण वेगळी भूमिका घेणार असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे सर्वांना 1 तारखेची प्रतीक्षा आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil slams mla ravi rana allegations over 50 khoke ekdam ok
हे देखील वाचा :
Maharashtra Politics | ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा’; भाजपच्या आमदाराने केली मागणी
Kishori Pednekar | SRA घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ