धुळे : बहुजननामा ऑनलाइन – Gulabrao Patil | बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे सेवक चंपासिंग थापा (Champasing Thapa) यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरही (Milind Narvekar) शिंदे गटात येत आहेत, असे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी काल धुळ्यात केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेतील (Shivsena) बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांनाच एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. तसेच मुख्यमंत्री शिंदे हे नार्वेकर यांच्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी सुद्धा गेले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, आम्ही 50 खोके घेतले असतील, पण ज्या चंपासिंह थापाने बाळासाहेबांची आयुष्यभर सेवा केली. त्यांना अग्नीडाग दिला, तो थापा आमच्याकडे आला, आता मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येत आहेत.
गुलाबराव पाटील त्यांच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात, मात्र यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या
(Shinde-Fadnavis Government) प्रतिमेवर देखील परिणाम होत आहे.
यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनीही शिंदे सरकारमधील काही नेत्यांची नावे घेत टीका केली होती. बिग बॉसमध्ये (Marathi Big Boss) बोलावले तर नक्की जाऊ.
बिग बॉसमध्ये जाणे ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल.
शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात नाटकामध्ये म्हणा, गाण्यांमध्ये म्हणा ही भाग घ्यायचो.
आता बिग बॉसमध्ये बोलावले तर ही सोन्यासारखी संधी आहे, मिळाली तर निश्चितपणाने जाऊ,
असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसापूर्वी केले होते.
मराठी बिग बॉसचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांना काही दिवसांपूर्वी प्रश्न विचारण्यात आला होता की, राजकारणातील कोणकोणते चेहरे बिग बॉसमध्ये पाहायला आवडतील.
त्यावर महेश मांजरेकर यांनी गुलाबराव पाटील यांचे नाव घेतले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil on uddhav thackeray pa milind narvekar join eknath shinde group dhule Marathi news
हे देखील वाचा :