जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – संजय राऊत काय मेंदूचे डॉक्टर आहेत का? त्यांच्या डोक्यात कोणता मेंदू आहे, असा सवाल करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाणे बंदबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) व गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी चांगलाच समाचार घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित बैठकीनंतर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) बोलत होते.
संजय राऊत हे नेहमीच काहीही बोलत असतात. बोलणे आणि प्रसिध्दी मिळवणे हे त्यांचे कामचं असल्याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या मोर्चाचा देखील यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि गिरीष महाजन यांनी समाचार घेतला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यांचा मेंदू तपासण्याची वेळ आली
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले, ‘संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलावे, केंद्र सरकार (Central Government) दिल्लीत आहे. पंतप्रधान, मंत्री तेथे असतात. त्यांना वाटत असेल आमचा मेंदू गहाण आहे, तर हे हास्यास्पद आहे. त्यांचाच मेंदू तपासण्याची वेळ आली आहे. तोल सुटल्याप्रमाणे ते बेताल वक्तव्य करीत आहेत.’ अशी टीका महाजन यांनी केली.
त्यांनी सोयरिक केलीच नाही
खासदार संजय राऊत यांनी ठाणे बंदबाबत शिवसेना (बाळासाहेबांची) यांच्यावर टीका करताना
त्यांना ‘गांडुळाचे मेंदु’ आहेत. अशा स्वरूपाचे वक्तव्य केले होते.
त्याचादेखील समाचार मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी घेतला.
गुलाबराव पाटील म्हणाले, ‘मोर्चे काढले पाहिजेत.आणि ते काढणे विरोधकांचे कामचं आहे. आपली मागणी सांगण्यासाठी आम्ही देखील मोर्चे काढायचो. पक्ष जागा असल्याची ती एक प्रवृत्ती असते. त्यांच्या मागण्या रास्त असतील तर निश्चितपणे सरकार त्याचा विचार करेल. मागण्या मान्य करण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जावे लागते. चर्चेची मागणी करावी लागते आणि न ऐकल्यास मोर्चा काढण्याबाबत सांगावे लागते. त्यांनी सोयरिक केलीच नाही. कसे म्हणणार प्रश्न सुटले नाहीत.’
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यांच्या डोक्यात नेमका कोणता मेंदू
तसेच संजय राऊत यांच्याबाबत पुढे बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राऊत मेंदूचे डॉक्टर थोडेच आहेत.
त्यांच्या डोक्यात नेमका कोणता मेंदू आहे. सांगितले तर बरे होईल. त्यांच्या म्हणण्याला किती महत्व द्यावे.
असा सवाल देखील यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना विचारला.
Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil on sanjay raut shivsena politics
हे देखील वाचा :
Bigg Boss 16 | या आठवड्यात अब्दू रोजीकला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार; नक्की काय घडले ?
MVA Mahamorcha | महामोर्चा सुरु असताना ठाकरे गटाला धक्का? आणखी एक आमदार, नगरसेवक शिंदे गटात?