बहुजननामा ऑनलाईन टीम : गुजरातमध्ये दारुबंदी असतानाही चक्क पोलिसानीच दारूच्या बाटल्या पोलीस ठाण्यातच लपवून ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील अरवली जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गुजरातमध्ये दारुबंदी असतानाही येथे बेकायदेशीरपणे दारूचा व्यवसाय होतो. अरवली जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकारी गाडीने जात होते. तेंव्हा त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यांच्या गाडीत 120 लिटर दारू आढळली. नंतर पोलिसांनी या प्रकरणी खोलवर तपास केला असता त्यात दोन पोलीस अधिकारी नाही तर तीन पोलीस अधिकारी असल्याचे समजले. इतकेच नाही तर 3 पोलीस अधिकार्यांनी मिळून अजून 70 लिटर दारू पोलीस ठाण्यात लपवल्याचे तपासात आढळून आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.