भरुच : वृत्त संस्था – महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये रुग्णालयांना आग लागण्याची घटना घडली असून भरुचमधील हॉस्टिपलला लागलेल्या आगीत १६ जणांचा आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यात दोन परिचारिकांचा समावेश आहे.
Gujarat| Fire breaks out at a COVID-19 care centre in Bharuch. Affected patients are being shifted to nearby hospitals. Details awaited. pic.twitter.com/pq88J0eRXY
— ANI (@ANI) April 30, 2021
गुजरातमधील भरुच येथील वेलफेअर हॉस्पिटलला मध्यरात्री १२ वाजता आगीची घटना घडली. कोव्हिड सेंटरला लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले.
भरुचचे पोलीस अधीक्षक राजेंद्रसिंह चुडासमा यांनी सांगितले की, अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. या रुग्णालयात एकूण ५८ रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. आग लागताच रुग्णांना बाहेर काढण्यास सुरुवात केली़ मात्र, तोपर्यंत १६ जणांचा मृत्यु झाला.