नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील गुडिया सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निकाल आला आहे. दिल्लीच्या कड़कड़डूमा कोर्टाने प्रदीप आणि मनोज या दोघांना दोषी ठरवले आहे. पोक्सो, अपहरण, सामूहिक बलात्कार आणि पुरावा मिटवल्याच्या गुन्ह्यांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. दोषींनी 5 वर्षांच्या मुलीवर 24 तासांपेक्षा जास्त वेळ ओलिस ठेवून बलात्कार केला होता.
निर्भया प्रकरणानंतर 4 महिन्यांनंतर 15 एप्रिल 2013 रोजी 5 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तेव्हा हे प्रकरण चर्चेत आले होते. गुडियाच्या शरीरातून एक मेणबत्ती आणि काचेची कुपीही बाहेर काढण्यात आली होती. एकापेक्षा अधिक शस्त्रक्रिया करून तिला वाचवण्यात आले होते. या प्रकरणात बिहार आणि उत्तर प्रदेशमधून दोन आरोपींना अटक करण्यात आली. दोषी ठरलेले मनोज शाह आणि प्रदीप हे दोघेही त्यांचे शेजारी होते. या खटल्याची सुनावणी पूर्ण होण्यासही वेळ लागला कारण प्रदीपने स्वत: ला या प्रकरणात अल्पवयीन सांगितले होते तसेच हे प्रकरण लांबवण्याचा प्रयत्न केला होता.
बलात्कारानंतर झाला होता हत्येचा प्रयत्न
ज्या वेळी गुडियावर बलात्कार करण्यात आला होता, त्यावेळी ती एक निरागस 5 वर्षांची मुलगी होती. बलात्कारानंतर दोन्ही आरोपींनी गुडियाला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. 15 एप्रिल 2013 रोजी संध्याकाळी ही गुडिया बेपत्ता झाली होती आणि ती 17 एप्रिल रोजी सकाळी सापडली.यानंतर तिला उपचारासाठी एम्स रुग्णालयात नेण्यात आले होते. जेथे अनेक दिवसांपासून तिची प्रकृती चिंताजनक होती.या सामूहिक बलात्कारामुळे दिल्ली पोलिसांविरूद्ध लोकांचा रोष वाढला होता.
वास्तविक, याआधी, 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर लवकरच अशी पुन्हा घटना घडल्यामुळे लोकांचा रोष वाढला होता. अशा परिस्थितीतच राजधानी दिल्लीत एका 5 वर्षाच्या मुलीसोबत घडलेल्या या बलात्कारानंतर पोलिस आणि प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा