हरियाणा / गुरुग्राम : वृत्तसंस्था – Grain ATM | अनेक उपभोक्त्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. हरियाणामधील (Haryana) गुरुग्राम जिल्ह्यात (Gurugram District) भारतातील पाहिलंच धान्याचं ATM सुरु करण्यात आलं आहे. या ATM सुविधेचा फायदा मोठ्या प्रमाणात लोकांना होणार आहे. धान्याचं Grain ATM सुरु केलं गेल्याने आता सरकारी रेशन दुकानासमोर भरगच्च लागणाऱ्या नागरिकांच्या रांगाची आता आवश्यकता लागणार नाही. यामुळे आता नागरिकांसाठी ही एक सुविधा सोपी करून दिली गेली आहे.
हरियाणा राज्य सरकारने (Government of Haryana) लोकांच्या सोयींसाठी धान्याचं ATM उभा करण्याचा निर्णय घेतला होता. हे धान्याचं ATM पायलट प्रोजेक्टचा एक भाग आहेत. शहरातील काही भागात या योजनेनुसार धान्याचे ATM प्रस्थापित करण्यात आले आहेत. दरम्यान, याचा फायदा नागरिकांना होणार आहे. तसेच, ऑटोमॅटिक मशीनद्वारे धान्य मिळाल्याने त्यात वजनाच्या आणि धान्य न मिळण्याच्या ग्राहकांच्या तक्रारी देखील होणार नाहीत. असा हरयाणा सरकारला विश्वास आहे.
दरम्यान, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला (Deputy Chief Minister Dushyant Chautala) यांनी म्हटलं आहे की, ‘या धान्याच्या ATM मुळे जनेतचा वेळ तर वाचेलच, पण त्यांना योग्य वजनासहीत धान्य मिळू शकेल. तसेच,’योग्य गुणवत्ता ते योग्य लाभार्थी’ (‘Right quality to right beneficiary) हाच या धान्याच्या ATM मागचा मुख्य हेतू असल्याचं देखील उपमुख्यमंत्री चौटाला यांनी सांगितलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
असं काम करतं धान्याचं ATM –
बँकेचे ATM तर आपण पाहिलेच असतील त्याच पद्धतीनं धान्याचं एटीएम देखील स्वयंचलित मशीन आहे. ‘युनायटेड नेशन्स’च्या ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ (The United Nations World FoodProgram) अंतर्गत स्थापित करण्यात आलेल्या या ATM मशिनला स्वयंचलित, वेगवेगळ्या
धान्यासाठी वापर (Multi Commodity) धान्य वाटप मशीन म्हटलं गेलं आहे. दरम्यान, धान्याच्या
या ATM मशीनमध्ये एक टच स्क्रीन बरोबर बायोमॅट्रीक सिस्टम (Biometric system) देखील
लावण्यात आला आहे. या मशीनमधून धान्य मिळवण्यासाठी लाभार्थ्याला आधार क्रमांक, रेशनिंग
कार्ड नंबर (Rationing card) त्यावर नोंदवावा लागणार आहे. तसेच, या मशीनमधून गहू, तांदूळ
आणि बाजरी अशा 3 प्रकारचं धान्य विकत घेता येऊ शकेल.येऊ शकणार आहे.
web title: Grain ATM | Grain can be obtained from ATM using only Aadhaar number!
Pune Police News | वारजे माळवाडी पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्यांना अटक
Rajesh Tope | लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आणि RT-PCR सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात ‘एंट्री’
SSC Result 2021 | दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार !
Sangli News । कोरोना झाल्याच्या भितीनं वाढदिवशीच सिव्हील इंजिनीअरनं केली आत्महत्या, प्रचंड खळबळ