नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुलींचे भविष्य आर्थिक रूपाने सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सर्वात चांगली योजना मानली जाते. याचे सर्वात मोठे कारण आहे कि एक सरकारी योजना आहे आणि यात चांगला परतावाही मिळतो. याशिवाय १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी बचत करायला केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना एक उत्तम गुंतवणूक योजना आहे. या गुंतवणूक योजनेत अनेक बदल झाले असून १२ डिसेंबर २०१९ च्या एका अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. आर्थिक मंत्रालयाने याबाबत सांगितले आहे कि सुकन्या समृद्व योजनेत काय-काय बदलले आहे.
वेळेच्या अगोदर बंद केल्यावर
सुकन्या योजनेच्या नवीन नियमांअंतर्गत ठराविक वेळेच्या अगोदर सुकन्या खाते बंद करण्यासाठी परवानगी आहे. मुलीला कोणता गंभीर आजार किंवा आई-वडिलांच्या मृत्यूच्या स्थितीत सुकन्या योजना खाते बंद करता येऊ शकते. पहिले सुकन्या योजनेत मुलीचा मृत्यू किंवा तिची राहती जागा बदलली तर खाते बंद करण्याची सुविधा आहे.
सुरक्षित भविष्य
सुकन्या समृद्धि योजनेत अद्याप कोणताही मोठा बदल झालेला नाही. तुमच्यासाठी हेही गरजेचे आहे कि मुलींचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या या सरकारी बचत योजनेत काय बदल झाले आहेत.
अधिक व्याज
सुकन्या योजनेच्या नवीन नियमांत जर तुम्ही कोणत्याही आर्थिक वर्षात कमीत कमी २५० रु. रक्कम जमा नाही केली तर तेव्हा त्याला डिफॉल्ट अकाउंटच मानले जाते. नव्या नियमांनुसार डिफॉल्ट अकाउंटमध्ये जमा रकमेवर व्याज मिळेल, जे नियमित खात्यावर मिळते.
सुकन्या खाते कसे ऑपरेट कराल ?
नव्या नियमांनुसार सुकन्या खाते मुलीच्या १८ वर्षापर्यंत नाही चालवले जाऊ शकत. पहिले सुकन्या खात्यात ही सुविधा होती कि मुलगी १० वर्षानंतर आपले सुकन्या खाते चालवू शकते. नवीन नियमानुसार सुकन्या खाते मुलीचे पालकच चालवू शकतात.
दोनपेक्षा जास्त मुली असतील तेव्हाच
आपल्याकडे दोनपेक्षा जास्त मुली असल्यास त्याच्यासाठी सुकन्या समृध्दी खाते उघडण्याचे नियमही बदलले आहेत. जर तुम्ही दोनपेक्षा जास्त मुलींसाठी सुकन्या खाते उघडत असाल तर त्यांचे जन्म प्रमाणपत्र तसेच प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. जुन्या नियमात पालकांना वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागले.
कोणते नियम बदलले ?
याशिवाय सुकन्या खात्यासंबंधित अनके तरतुदी बदलल्या आहेत आणि काहींबाबत स्पष्टीकरण दिले गेले आहे. नव्या नियमांमध्ये चुकून जमा झालेले व्याज परत घेण्यास बंदी आहे. आता सुकन्या खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज दिले जाणार आहे.