नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे देशातील अनेक वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. देशव्यापी लॉकडाउनमुळे मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने यापूर्वी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, तीच मुदतवाढ आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
यासंदर्भातील आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), झणउ, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा विमा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता संपलेली आहे किंवा देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्यांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत आहेत. अशांसाठी हा आदेश देण्यात आलेला आहे.
Union Minister Nitin Gadkari today announced a further extension of the validity date of motor vehicle documents till September this year. Accordingly, the Ministry of RTH has issued an advisory to all States and UTs to this effect: Ministry of Road Transport and Highways pic.twitter.com/JX2Pxh5k2P
— ANI (@ANI) June 9, 2020
ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, झणउसारख्या कागदपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी ते 30 जूनच्या कालावधीत संपत आहे, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. देशव्यापी लॉकडाउनमुळे वैधता संपलेल्या कागदपत्रांच्या नुतनीकरणासाठी अडचणी येत असल्याने हा आदेश देण्यात आलेला आहे. लॉकडाउनुळे मंत्रालयाने दुसर्यांदा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.