नवी दिल्ली, वृत्तसंस्था – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोटर वाहन (संशोधन) विधेयक 2019 ला या महिन्याचा सुरुवातीला मंजुरी दिली होती. यात कठोर असे 19 वाहतूकीचे नियम आहेत, ज्याचे उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंतचा दंड तुम्हाला ठोठावण्यात येऊ शकतो. हे नियम आजपासून (1 सप्टेंबर) लागू होतील. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर पोलिसांना 8 महत्वाचे अधिकार देण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस आता वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर या अधिकारांनुसार कठोर कारवाई करणार आहेत.
या विधेयकात तरतूद आहे की अल्पवयीन असलेल्यांनी वाहन चालवले आणि अपघात झाल्यास त्यांच्या पालकांना 3 वर्षांचा तुरुंगवास होईल. तसेच रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल आणि दंड देखील ठोठवण्यात येईल.
वाहन परवाना नसल्यास वाहन चालवल्यास एग्रीगेटर्सला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. वेगाने वाहन चालवल्यास वाहन चालकाला 1,000 ते 2,000 रुपये दंड भरावा लागले.
मोटर वाहन (संशोधन) विधेयक 2019 मधील हे आहेत नवे कायदे –
1. कलम 178 अंतर्गत विना तिकिट प्रवास केल्यास 500 रुपये दंड भरावा लागेल.
2. कलम 179 नुसार ऑथेरिटीजच्या आदेशाचे उलंघ्घन केल्यास 2000 रुपये दंड भरावा लागेल.
3. कलम 181 नुसार विना परवाना वाहन चालवल्यास 5000 रुपये दंड ठोठावण्यात येईल.
4. कलम 182 नुसार पात्र नसताना वाहन चालवल्यास 10,000 रुपये दंड भरावा लागेल.
5. कलम 183 नुसार वेगाने वाहन चालवल्यास 1000 रुपये दंड भरावा लागेल.
6. कलम 184 नुसार धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास 500 रुपये दंड भरावा लागेल.
7. कलम 185 नुसार दारु पिऊन वाहन चालवल्यास 10,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल.
8. कलम 189 नुसार स्पीडिंग रेसिंगवर 5,000 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.
9. कलम 1921 A नुसार विना परवाना वाहन चालवल्यास 10,000 रुपये दंड भरावा लागेल.
10. कलम 193 नुसार वाहन परवान्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यास 25,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत दंड सोसावा लागेल.
11. कलम 194 नुसार ओवरलोडिंगमुळे 2000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
12. कलम 194 A नुसार ओवरलोडिंग पेसेंजर 1000 रुपये दंड असेल.
13. कलम 194 B नुसार सीट बेल्ड नसल्यास 1000 रुपये दंड भरावा लागेल.
14. कलम 194 C नुसार दुचाकीवर ओवर लोडिंगवर म्हणजेच ट्रिप्सीवर 2000 रुपये दंड आणि 3 महिना वाहन परवाना रद्द करण्यात येईल.
15. कलन 194 D नुसार विना हेल्मेट आढळल्यास 1000 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द करण्यात येईल.
16. कलम 194 E नुसार रुग्णावाहिकांसारख्या आप्तकालीन वाहनांना रस्ता न दिल्यास 10,000 रुपये दंड भरावा लागेल.
17. कलम 196 अंतर्गत विना वीमा असलेले वाहन चालवल्यास 2000 रुपये दंड सोसावा लागेल.
18. कलम 199 नुसार अल्पवयीन वाहन चालवल्यास त्यांच्या पालकांना दोषी ठरवण्यात येईल. त्यांना 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येईल. तसेच अल्पवयीन वाहन चालकांवर जुवेलाइन कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. शिवाय वाहनाचे रजिस्ट्रेशन देखील रद्द करण्यात येईल.
19. अधिकाऱ्यांना मिळालेल्या अधिकारांमध्ये कलम 183, 184, 185, 189, 190, 194 C, 194 D, 194 E अंतर्गत वाहन परवाना रद्द करण्यात येईल.