बहुजननामा ओनलाईन टीम : ऑनलाईन औषधे खरेदी करणार्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) परवाना नसलेल्या ऑनलाईन औषध विक्री प्लेटफार्मद्वारे औषधे विक्रीवर बंदी घातली आहे. विक्रीवरील बंदीचा आदेश सर्व राज्यात प्रसारित करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नियामक एजन्सी ई-फार्मसीस संबंधित नियमांचा मसुदा तयार करुन जाहीर केला जात नाही. प्रस्तावात सांगितल्याप्रमाणे, नियमांबाबत ई-फार्मेसींची नोंद शासनाकडे करावी आणि त्यांच्या डॉक्टर व रूग्णांना दिलेल्या प्रिस्क्रिप्शनची नोंद ठेवली जावी. संकेतस्थळाने सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, सीडीएससीओच्या स्रोताचा हवाला देत म्हटले की, ई-फार्मेसीसंदर्भातील नियम व कायदे अजूनही चालू आहेत.
डीसीजीआयचे प्रमुख व्ही.जी. सोमानी यांनी २८ नोव्हेंबर रोजी या आदेशानंतर या व्यवसायात पैशांची गुंतवणूक करणारे अनेक प्लॅटफॉर्म आता अडचणीत सापडले आहेत. डीसीजीआयने आपल्या पत्रामध्ये १२ डिसेंबर २०१८ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला दिला आहे, डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर जहीर अहमद यांनी खटला दाखल केला होता. ई-फार्मेसीना ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स (डी अँड सी) कायद्याचे उल्लंघन करणऱ्या ई-फार्मेसीना परवान्या नसल्यामुळे औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घालण्यात यावी, असे या आदेशात म्हटले आहे.
Visit : bahujannama.com