नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉक्टर नेहमी असे सांगतात की, रोज नियमित चालला तर तुम्ही निरोगी राहताल. पण आता चालल्याने तुमचा मोबाईल फोनही चार्ज होणार आहे. याबद्दल नववीच्या विद्यार्थ्यांनी एक करिष्मा करून दाखवला आहे. गोरखपूर येथील पिलर अकॅडमीमधील काही विद्यार्थ्यांनी एक प्रयोग करत मोबाईल चार्ज करण्याचा नवीन उपाय शोधून काढला आहे.
अशा प्रकारे होते काम
ही यंत्रणा निर्माण केलेल्या विद्यार्थ्यांची श्रुजन व्दिवेदी, आर्य जायलवाल, अभियोजन प्रसाद आणि लक्ष्य प्रताप सिंह अशी नावे आहेत. त्यांनी दोन इलेक्ट्रिक प्लेट, दोन बल्ब, बॅटरी आणि यूएसबी केबलच्या साहाय्याने हे उपकरण बनवले असून ते सर्व बुटांमध्ये फिट करण्यात आले, ही विशेष बाब आहे. त्यामुळे तुम्ही जितके चालाल तितकाच तुमचा मोबाईल चार्ज होणार आहे.
दोन हजार रुपये आला खर्च
शाळेत होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात काहीतरी हटके करण्याचा या विद्यार्थ्यांचा विचार होता. त्यामुळे त्यातूनच त्यांनी ही संकल्पना निर्माण केली. त्यांनी गूगल वरून चालताना मोबाईल कसा चार्ज होतो, हे समजून घेतले. त्यासाठी त्यांनी दोन हजार रुपये खर्च करून या प्रकल्पाची निर्मिती केली. प्रायमरी तत्वावर याची निर्मिती करण्यात आली असून नंतर रिसर्च करून याला चांगला आकार देण्यात आला आहे, असे तेथील शिक्षकांनी सांगितले. पण या प्रकल्पाची विशेष बाब अशी की, तुमचा मोबाईल तर चार्ज होणारच पण सोबतच तुमचे आरोग्यही चांगले राहील.
Visit : bahujannama.com