मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gopichand Padalkar On Thackeray Government | इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन (OBC Political Reservation) महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण (Madhya Pradesh OBC Reservation) लागू होण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) होकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) टीका केली जातेय. मध्यप्रदेशमध्ये आरक्षण लागू होतेय महाराष्ट्रात का होत नाही? असा सवाल भाजप करत आहे. यानंतर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
त्यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व घालवण्याचे षडयंत्र या महाविकास आघाडी सरकारने आखलेले आहे. ओबीसींचा राजकीय गळा घोटण्याचे आघाडी सरकार करत आहे. आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाही राज्य सरकारकडून ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंबंधी कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही.” असं ते म्हणाले. (Gopichand Padalkar On Thackeray Government)
पुढे पडळकर म्हणाले, “105 ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या असताना प्रत्येक नगरपचंयातीमधून 4 ओबीसीचे नगरसेवक निवडून जात होते. म्हणजे एकूण 420 नगरसेवक ओबीसीतून जात असताना ते गेले नाहीत. महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका आरक्षणाशिवाय झाल्या म्हणजे पुढील 5 वर्ष ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळणार नाही अशा प्रकारचे षडयंत्र आघाडी सरकारने रचले आहे,” असा आरोप त्यांनी केला.
Web Title :- Gopichand Padalkar On Thackeray Government | mahavikas aghadi conspiracy to deprive obc of political representation allegation of bjp leader gopichand padalkar
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- PM Suraksha Bima Yojana-PMSBY | PM सुरक्षा विमा योजनेच्या नियमात बदल; प्रीमियम तब्बल इतक्या टक्क्यांनी वाढला, जाणून घ्या
- Eknath Khadse | विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंना उमेदवारी?; राजकीय हालचालींना वेग
- Pune Crime | कोर्टाबाहेर माजी सैनिकाचा गोळीबार ! पत्नीचा मृत्यू तर सासू गंभीर जखमी, शिरुरमध्ये प्रचंड खळबळ