पुणे / जेजुरी : बहुजननामा ऑनलाइन – Gopichand Padalkar On Sharad Pawar | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) हे जेजुरीत (Jejuri News) खंडेरायाच्या दर्शनासाठी आले होते. अहिल्यादेवी होळकर यांची आज 297 वी जयंती (Ahilyadevi Holkar Jayanti) आहे. यावरून आता पुन्हा एकदा भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) राजकीय शीतयुद्ध रंगल असल्याचं पाहायला मिळालं. गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. (Gopichand Padalkar On Sharad Pawar)
गोपीचंद पडळकर म्हणाले, “1993 च्या बॉम्बस्फोटात सहभाग असणाऱ्या आणि शेकडो हिंदूंचा खून करणारे आज सत्तेत बसले आहेत. त्या भ्रष्टाचारी आणि जातीयवादी लोकांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्या जातीयवादी लोकांचे हात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला लागले होते. त्यामुळे आज आम्ही अहिल्यादेवींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून त्याचे शुद्धीकरण करत असल्याचे,’ ते म्हणाले.
पुढे पडळकर म्हणाले, “खेड तालुक्यातील वाफगावचा किल्ला आम्ही अनेक वर्षापासून मागत आहोत. मात्र, शरद पवार हे फुकट हा किल्ला वापरत आहेत, होळकरांच्या जमिनी त्यांनी ढापल्या, काठेवाडी येथील जमिनीचे मिळालेले पैसे होळकरांच्या कुटुंबाला मिळाले नसून हे पैसे सुद्धा ढापले असून होळकरांच्या जमिनीवर यांचाच डोळा असल्याचा,’ आरोप देखील पडळकर यांनी केला आहे.
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी या जयंतीचे राजकारण सुरू केले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर आणि झेंडे लावून जयंतीचा कार्यक्रम केला जातोय. तो आम्ही कदापि सहन करणार नसल्याचंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर चौंडी हे आमचे प्रेरणास्थान आहे. आमच्या चळवळीचे ठिकाण चौंडी आहे. आपला हा समाज नेमका कुठून जागा होतोय हे पवारांना कळलं म्हणून त्यांनी चौंडी ताब्यात घेण्याच षडयंत्र रचलं असून उद्या तिथं दंगल घडविण्याचा प्लॅन शरद पवार आणि रोहित पवार यांनी आखल्याचं,’ ते म्हणाले.
Web Title : Gopichand Padalkar On Sharad Pawar | bjp leader and MLA gopichand padalkar slams ncp chief sharad pawar over ahilyadevi holkar jayanti
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Pune Crime | पुण्याच्या हडपसरमधील खूनाचे सत्र थांबेना; गुन्हेगाराचा निर्घुण खून
Pune Crime | पुण्याच्या हडपसरमधील खूनाचे सत्र थांबेना; गुन्हेगाराचा निर्घुण खून
Pune Minor Girl Rape Case | भर दिवसा 65 वर्षाच्या नराधमाकडून 12 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार