मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित आज पडळकर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत पडळकरांना निवडणूक लढविणे जोखमीचे ठरणार आहे.
गेल्या कित्येक पिढ्यांपासून बारामतीत पवार घराण्याची सत्ता आहे. १९६७ ते १९९० पर्यंत म्हणजे सहा वेळा शरद पवार हे बारामती मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहे. त्यानंतर अजित पवार देखील १९९९ ते २०१४ पर्यंत सहज निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीतही अजित पवार १ लाखपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले होते.
त्यामुळे पडळकरांना वाटते तितकी ही जोखीम सोपी नसणार आहे. कारण जरी देशात भाजपची लाट असली तरी बारामतीत पवार कुटुंबियांना मानणारा मोठा गट आहे. दरम्यान, गोपीचंद पडवळकरांनी सांगलीतून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली होती. मात्र संजय काकडे हे ५ लाख ८ हजार मताने विजयी झाले होते. त्यामुळे येत्या निवडणुकीत पडळकर पवारांना कशी झुंज देणार याकडे उत्सुकता लागणार आहे.
Visit : bahujannama.com