बहुजननामा ऑनलाइन टीम – बिहारच्या गोपाळगंजमध्ये एक आश्चर्यचकित घटना घडली आहे. चक्क सात वर्षाचा मुलगा मतदानासाठी गेला त्यावेळी त्याला पाहून निवडणूक कर्मचारी देखील आश्चर्यचकित झाले. तो मुलगा हातात मतदार स्लिप आणि आधार कार्ड घेऊन गेला होता आणि या मुलाच्या नावाची नोंद मतदार यादीमध्येही झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रविवारी गोपाळगंजमध्ये प्राथमिक कृषी पत संस्था / पीएसीएसचा चौथा टप्पा होता आणि जिल्ह्यातील हथुआ व कुचायकोट गटात सकाळपासूनच मतदान सुरू होते. मतदानाच्यावेळी, पीएसीएस निवडणुकीत 7 वर्षाच्या मुलगा मतदान करण्यासाठी बूथवर आला. जेव्हा ड्यूटी दरम्यान अधिकाऱ्यांनी पाहिले की 7 वर्षाचा मुलगा मतदान करण्यासाठी आला आहे ते देखील आश्चर्यचकित झाले. अधिकारी आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले.
7 वर्षांच्या निरागस मुलाने आपले नाव फैजल सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी त्या मुलाची चर्चा रेकॉर्ड केली आहे. रेकॉर्ड झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. मुलाने सांगितले की, त्याच्या वडिलांचे नाव ताज मोहम्मद आहे. तो पौली गावचा रहिवासी आहे. जेव्हा मतदानाच्या अधिकार्यांनी मुलाला विचारले की, आपण येथे का आला आहात, तेव्हा मुलाने अत्यंत निरागपणे सांगितले की, तो येथे मत करण्यासाठी आला आहे. येथे पॅक्सची निवडणूक असल्यामुळे तो देखील आपले मतदार स्लिप आणि आधार कार्डसह मत देण्यासाठी पोहोचला होता.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलाने सांगितले, की तो एलकेजीमध्ये शिकत आहे आणि तो आपल्या आधार कार्डसह मत देण्यासाठी येथे आला आहे. जेव्हा अधिकाऱ्यांनी त्याचे आधार कार्ड तपासले आणि मतदार यादीही नाव पाहिले तेव्हा ते आश्चर्य करु लागले.
मुलाचे नाव देखील मतदार यादीमध्ये दाखल
या मतदार यादीतील मुलाचे नाव फैजल अली आणि वडिलांचे नाव ताज मोहम्मद आहे. मतदार यादीमध्ये कोणत्याही प्रकारच्या वयाचा उल्लेख नाही. ज्यामुळे हे सांगणे कठीण आहे की या मुलाचे नाव मतदार यादीत कसे काय आहे. परंतु वडिलांचे नाव आणि आधार कार्डच्या आधारे या मुलाचे नाव मतदार यादीमध्ये आहे. जरी मुलाचा वाढदिवस 2012 आधार कार्डमध्ये नोंदविला गेला आहे. म्हणजेच त्याचे वय अवघ्या 7 वर्ष आहे. या लहान मुलाचे नाव मतदार यादीमध्ये पाहिल्यानंतर मुलाचे नाव मतदार यादीमध्ये कसे दाखल झाले हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.