नवी दिल्ली : वृत्तसंस्था- अनेक देशांत टिक-टॉकची या अप्लिकेशनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात भारतात अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत त्याची क्रेझ जरा जास्तच प्रमाणात आहे. टिकटॉकला कमी कालावधीत मिळालेली प्रसिद्धी आणि त्याचा वाढता वापराने इतर मोठ्या कंपन्यांसमोर आव्हान उभे केले आहे. काही दिवसांपूर्वीच टिकटॉकला मात देण्यासाठी फेसबुकने महत्वाची घोषणा केली होती, त्यानंतर आता गुगलनेही टिकटॉकला टक्कर देण्याचा विडा उचलला असून गुगल आता नवीन ऍप लाँच करण्याच्या तयारीत आहे. गुगल ‘फायरवर्क’ हे अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडिओ शेअरिंग ऍप खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
दरम्यान फायरवर्क हे ऍप खरेदी करण्यासाठी गुगलबरोबरच चीनची मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Weiboसुद्धा तयार आहे. परंतु फायरवर्क हे आप्लिकेशन खरेदी करण्याच्या शर्यतीत गुगल इतर कंपन्यांच्या पुढे आहे. भारतात गेल्याच महिन्यात फायरवर्क लाँच करण्यात आलं. फायरवर्कला या वर्षाच्या सुरूवातीला १०० मिलियन डॉलर नफा प्राप्त झाला असून टिकटॉकची सहयोगी कंपनी बाइटडान्सनं ७५ मिलियन डॉलर आहे.
फायरवर्क अॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या १०लाखांपेक्षा अधिक आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंगसाठी असलेले फायरवर्क हे ऍप टिकटॉक पेक्षा वेगळे आहे. यामध्ये युजर्स व्हर्टिकल व्हिडिओसोबतच आपण हॉरिजॉन्टल व्हिडिओदेखील शूट करू शकतो. या ऍपचे वैशिष्ट्य म्हणजे फायरवर्क युजर्स ३० सेकंदाचा व्हिडिओ बनवू शकतो तर टिकटॉकमध्ये आपण फक्त १५ सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवू शकतो. फायरवर्क अॅप अँड्रोइड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे. त्यामुळे टिकटॉकप्रमाणे फायरवर्कलाही भारतात चांगली प्रसिद्धी मिळेल असा दावा कंपनीनं केला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया कंपनी फेसबुकसुद्धा युजर्समध्ये शॉर्ट व्हिडिओ मेकिंगची वाढलेली क्रेझ आणि टिकटॉकला टक्कर देणासाठी एक नवीन अॅप लाँच केले आहे. lasso नावाचं हे ऍप मागच्य वर्षी नोव्हेंबर महिन्यात फेसबुकनं लाँच केले आहे. फेसबुकचं हे अॅप सध्यातरी फक्त अमेरिकेतच उपलब्ध आहे. दरम्यान, भारतात टिक टॉक अॅपवर बंदी घालण्यात आली होती. या ऍपचा गैरवापर करण्यात येत असून याद्वारे अश्लिल मजकूर अपलोड करण्यात येत असल्याने ही मागणी करण्यात आली होती. बंदीनंतर या अॅपवरील सुमारे ६० लाख व्हिडिओ डिलिट करण्यात आले होते तसेच बंदीमुळे २५० नोकऱ्याही धोक्यात आल्या होत्या. मात्र, कालांतराने न्यायालयाने टिक टॉकवरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. टिक टॉकचे १२ कोटी यूजर्स आहे.
Visit : bahujannama.com