नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google Play स्टोरवर दररोज मालवेअर वाले अॅप्स येत असतात . मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा गूगल प्ले स्टोर वरून २४ अॅप्स काढून टाकण्यात आले आहे. हे अॅप्स मालवेअर वाले होते. आणि वापरकर्त्याचा डेटा चिनी सर्व्हरला पाठविला जात होता. असे म्हटले जात आहे की हे अॅप्स एकाच चिनी डेव्हलपर गूगल प्ले स्टोअरवर अपलोड केले होते. VPN Pro ब्लॉगपोस्टच्या मते Shenzhen HAWK नावाची चीनी कंपनी आहे. ही कंपनी TCL Corporation सहाय्यक कंपनी असल्याचे म्हटले जाते. या कंपनीने गुगल प्ले स्टोअरवर 24 अॅप्स अपलोड केले आहेत. आतापर्यंत हे अॅप 382 दशलक्ष वेळा डाउनलोड केले गेले आहेत. या अॅप मध्ये वापरकर्त्यांकडून संवेदनशील परवानगीची मागणी करण्यात आली होती आणि त्यातील काहीजणांकडे मालवेअर देखील होते.
असे अॅप सहसा वापरकर्ते डाउनलोड करतात. वॅदर फोरकास्ट अॅपवर 10 दशलक्षाहून अधिक डाउनलोड आहेत. याशिवाय सुपर क्लीनरसुद्धा 100 दशलक्ष वेळा डाउनलोड केले गेले आहे. VPN Pro ब्लॉगपोस्टच्या माहितीनुसार जेव्हा गुगलला याबाबत माहिती देण्यात आली तेव्हा काही काळानंतर कंपनीने गुगल अॅप स्टोअर वरून हे अॅप्स काढून टाकले. एका निवेदनात गुगलने फोर्ब्सना सांगितले आहे की, ‘आम्ही सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उल्लंघनांबाबतच्या अहवालाला गंभीर मानतो. आम्हाला धोरणाचे उल्लंघन करणारे अॅप्स आढळल्यास आम्ही त्यांना प्ले स्टोअरमधून काढून टाकतो. त्या अॅप्सची यादी येथे आहे. आपल्याकडे आपल्या स्मार्टफोनमध्येही हे अॅप्स असल्यास, त्यांना त्वरित हटवा
1. World Zoo
2. Puzzle Box
3. Word Crossy!
4. Soccer Pinball
5. Dig it
6. Laser Break
7. Word Crush
8. Music Roam
9. File Manager
10. Sound Recorder
11. Joy Launcher
12. Turbo Browser
13. Weather Forecast
14. Calendar Lite
15. Candy Selfie Camera
16. Private Browser
17. Super Cleaner
18. Super Battery
19. Virus Cleaner 2019
20. Hi Security 2019
21. Hi VPN, Free VPN
22. Hi VPN Pro
23. Net Master
24. Candy Gallery