नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगलकडून गुगल फोटो विनामूल्य क्वाऊड स्टोरेजची सुविधा 1 जूनपासून बंद केली जाणार आहे. जर तुम्ही गुगल ड्राईव्ह किंवा इतर कोणत्याही जागी आपले फोटो आणि डेटा स्टोअर करत असाल तर यासाठी शुल्क द्यावे लागेल. गुगलचे हे नवीन नियम 1 जूनपूर्वी जेवढे फोटो आणि व्हिडिओ अपलोड झाले असतील त्यांना लागू होणार नाही. यामुळे 1 जूनपर्यंत आपण हवा तितका बॅकअप घेऊ शकता. जर तुम्हाला गुगल फोटोजसाठी पैसे द्यायचे नसतील तर तुम्ही पेन ड्राईव्ह, ओटीजी किंवा हार्ड ड्राईव्ह वापरण्याचा पारंपरिक मार्ग अवलंबता येईल. ओटीजी तुम्ही थेट फोनला लावून बॅकअप घेऊ शकता आणि गरज पडल्यास लॅपटॉपमध्येही ठेवता येऊ शकते.
गुगलने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक जीमेल वापरकर्त्याला 15 जीबीचा स्पेस दिला जाईल, या स्पेसमध्ये फोटोंसह जीमेलचे सर्व इमेल्स आणि गुगल ड्राइव्हसाठी वापरण्यात येणारी स्पेसदेखील समाविष्ट राहिल. जर तुम्हाला 15 जीबीहून जास्त स्पेस वापरायचा असेल तर यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. गुगल-1 अंतर्गत कंपनीचा 2 जीबी पर्यंतची स्पेस वापरकर्त्यांना देण्याचा प्लॅन आहे, जी आपण खरेदी करू शकता यासाठी महिन्याचे किंवा वर्षाचे पैसे मोजावे लागणार आहेत. यापैकी कोणता प्लॅन घ्यायचा हे आपल्याला ठरवता येईल.
गुगल फोटोजसाठी तीन प्रकारचे स्टोरेज मिळेल
हाय कॉलिटी, ओरीजनल कॉलिटी, एक्सप्रेस कॉलिटी असे गुगल फोटोसाठी 3 प्रकारचे स्टोरेज मिळते. हाय क्वालिटी अंतर्गत 16 मेगापिक्सेल पर्यंतच्या फोटोजचे आणि फुल एचडी व्हिडिओचे बॅकअप घेता येईल. ओरिजनल क्वालिटीमध्ये तुमचा फोटो असेल त्या कॉलिटीत काहीही बदल न करता सेव होईल. एक्सप्रेस कॉलिटीमध्ये फोटो आणि व्हिडिओ कॉम्प्रेस करून अपलोड केले जातील. येथे क्वालिटी कमी होऊ शकते. यापैकी ओरिजनल क्वालिटी सिलेक्ट केल्यास आताही पैसे द्यावे लागतात. मात्र हाय क्वालिटी आणि एक्सप्रेस कॉलिटीमध्ये घेतलेले फोटोज फ्री असतात. 1 जून पासून हे बदलणार आहे.
गुगल फोटोजला असलेल्या दुसऱ्या पर्यायांचा विचार केला तर आपल्याला अनेक क्लाऊड स्टोरेज मिळू शकतात. मात्र, यासाठीही गुगल इतकेच किंवा काही वेळेस त्याहून जास्त पैसे मोजावे लागतात. दुसऱ्या क्लाउड सर्विसेसवरतीही काही फ्री स्पेस मिळते. जसे की 5 जीबीपर्यंत मिळणारी स्पेस, मात्र अशा वेगवेगळ्या क्लाऊड स्टोरेजवर आपला 5-5 जीबी डेटा ठेवणे योग्य ठरणार नाही.