नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगल असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा वापर सर्वचजण सध्या माहिती घेण्यासाठी करतात. कारण आपल्याला विश्वास आहे की, गुगलवर उपलब्ध माहिती 100 टक्के खरी आहे. परंतु, हे गुगलच आहे जे प्रत्येक क्षणी आपल्या स्मार्टफोनवर लक्ष ठेवते. गुगलला हे सुद्धा माहिती असते की, आपण कुठे जात आहोत आणि आपण काय सर्च करत आहोत. मात्र, हा प्लॅटफॉर्म आपल्या सेवा चांगल्या करण्यासाठीच आपल्या डेटाचा वापर करतो. ज्यामुळे आपल्याला अचूक परिणाम मिळतात. गुगलने तुमचे लोकेशन ट्रॅक करू नये, असे तुम्हाला वाटत असेल तर आम्ही येथे एक पद्धत सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही त्यास ब्लॉक करू शकता. जाणून घेवूयात…
असे करा लोकेशन ट्रॅकिंग बंद
लोकेशन ट्रॅकिंग बंद करण्याचे दोन पर्याय आहेत. पहिल्या प्रकारच्या ऑपशनमध्ये तुमच्या डिव्हाईसमधील सर्व अॅपचे लोकेशन डेटाची परमिशन ब्लॉक करा.
परमिशन ब्लॉक करण्याचा पहिला ऑपशन
* यूजरला अँड्राईड स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल
* यानंतर लोकेशन डेटावर क्लिक करावे लागेल
* नंतर लोकेशन परमिशनचे लेफ्ट स्वाइप करून टर्न ऑफ करता येईल. अशाप्रकारे परमिशनला टर्न ऑन सुद्धा करता येईल.
परमिशन ब्लॉक करण्याचा दुसरा ऑपशन
* गुगल अकाऊंटचे लोकेशन हिस्ट्री फीचर टर्न ऑफ करून सुद्धा लोकेशन ट्रॅकिंग टर्न ऑफ करता येते. याद्वारे सुद्धा गुगल अॅप्स आणि सर्व्हिसला सिंगल स्वाइप करून बंद करता येईल.
* गुगल अकाऊंटच्या सेटिंग ऑपशनवर क्लिक करावे लागेल.
* यानंतर Manage your Google Account वर क्लिक करावे लागेल.
* यानंतर गुगल अकाऊंटच्या Privacy & Personalization वर क्लिक करावे लागेल.
* अॅक्टिव्हिटी कंट्रोल सेक्शनच्या Location Histry वर क्लिक करावे लागेल.
* यानंतर लेफ्ट स्वाइप करून लोकेशन हिस्ट्री टर्न ऑफ करता येईल.
एखाद्या खास गुगल अॅपची लोकेशन परमिशन बंद करण्यासाठी अशी सेटिंग करा…
* अँड्राइट फोनच्या सेटिंग अॅपमध्ये क्लिक करा
* यानंतर लोकेशनवर टॅप करा
* यानंतर ज्या अॅपचे लोकेशन अॅक्सेसची परमिशन द्यायची आहे त्यास राईट स्वाईप करून ऑन करू शकता किंवा ब्लॉक करू शकता.