मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची रविवारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांच्या पोटात दुखत होते. यानंतर पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल केले असता त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. यानंतर पंतप्रधान मोदींसह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेमंडळीनी त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. यामुळे शरद पवार यांनी सर्वांचे आभार मानत पंतप्रधान मोदींचेही त्यांनी आभार मानले आहे.
यावरून दिल्लीतील अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. यावरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फोनवर विचारपूस केल्याचे पवार यांनी ट्विटरवर सांगितले. लता मंगेशकर यांनी प्रकृतीची विचारपूस केली. या सदिच्छांबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे, असे पवार यांनी म्हटले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लवकर बरे व्हावे अशी विचारपूस करत, भावना व्यक्त केली. मोदी यांचेही पवार यांनी आभार मानले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, निर्मला सीतारमन यांनी विचारपूस केल्याचेही पवार यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.
तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पवार लवकर बरे व्हावे यासाठी सदिच्छा दिल्या. तर पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी शरद पवार यांचा बंगाल दौरा होता, हा दौरा आता रद्द करण्यात आला आहे. केरळमध्येही पवार प्रचार दौरे करणार होते. परंतु, प्रकृती बिघडल्याने आगामी २ आठवड्यांसाठी पवार यांचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उद्या त्यांच्यावर ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, एण्डोस्कोपी व शस्त्रक्रिया केली जाईल. दरम्यान, माझे सर्व सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मित्रमंडळींनी व सुहृदांनी आवर्जून तब्येतीच्या चौकशीसाठी फोन केले, संदेश ठेवले, आपल्या सर्वांच्या सदिच्छांचे बळ मिळाले. मनपूर्वक धन्यवाद, असे ट्विट शरद पवार यांनी केल आहे.