बहुजननामा ऑनलाइन टीम – हिवाळ्यात अंड्यांची मागणी खूप वाढते. अशावेळी तुम्ही पोल्ट्री फार्मचा बिझनेस करून(profitable business) चांगली कमाई करू शकता. या बिझनेससाठी तुम्हाला जास्त पैसेसुद्धा खर्च करावे लागत नाहीत आणि कमाईसुद्धा चांगली होते. यासाठी जास्त शिक्षणाची गरज नसते आणि जास्त पैशांची आवश्यकता नसते. जाणून घेऊयात याबाबत सर्व काही…
बिझनेस सुरू करण्यासाठी जागा
कुक्कुट पालनाची सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम जागेची आवश्यकता असते. या बिझनेससाठी छोट्या स्तरावर जास्त जागेची गरज नसते. परंतु मोठ्या प्रमाणात बिझनेस सुरू करण्यासाठी मोठी जागा लागते. यासाठी जागा नेहमी सार्वजनिक परिसरापासून थोडी दूर असावी लागते. यामध्ये जास्त पाण्याची गरज नसते, केवळ स्वच्छतेकडे लक्ष देणे जरुरी आहे. स्वच्छ हवा, ऊन आणि वाहन येण्या-जाण्यासाठी चांगली व्यवस्था असावी.
अशाप्रकारे करू शकता कमाई
पोल्ट्री फार्मच्या बिझनेसमध्ये दोन प्रकारे कमाई होते, अंडे आणि मांस. यामध्ये अंड्याच्या उत्पादनाची प्रक्रिया आणि ब्रॉयलर उत्पादनाच्या प्रक्रियेची माहिती घ्यावी लागते. सोबतच वापरासाठी उपकरणांची माहिती आवश्यक असते. यासाठी सरकारच्या ब्रॉयलर प्लस योजनेंतर्गत सर्व माहिती मिळते. या बिझनेसमधून दुसर्यांना रोजगार दिला जाऊ शकतो.
अशा प्रकारे करा अप्लाय
पोल्ट्री फार्मसाठी कोणत्याही सरकारी बँकेतून लोन घेता येते. भारतीय स्टेट बँक या बिझनेससाठी एकूण खर्चाच्या 75 टक्के लोन देते. या योजनेचे नाव ’ब्रॉयलर प्लस’ योजना ठेवण्यात आले आहे. एसबीआयकडून 9 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते, जे 5 वर्षांत परत करायचे आहे.
भारतीय स्टेट बँकेत 5,000 कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्मसाठी 3,00,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. येथून तुम्ही 9 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. जर एखाद्या कारणामुळे कर्ज 5 वर्षांत चुकते करता आले नाही, तर 6 महिन्यांची आणखी वेळ दिली जाते.
सर्वप्रथम ओळखपत्रासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, व्हाेटर आयडी, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणत्याही एकाची आवश्यकता असते. दोन फोटो, अॅड्रेस प्रूफ, बँक अकाउंट स्टेटमेंटची फोटो कॉपी आणि कुक्कुट पालन प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेत द्यावा लागतो.