मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला यापूर्वी दि. 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन या योजनेला दि. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली आहे.
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्केपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत दिली जेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारात ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने या योजनेला दि. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिल्याचे परिवहनमंत्री परब यांनी सांगितले.