मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी वेगवेगळ्या योजना आणत असतात. हरियाणा सरकारने वीज समस्येपासून सामान्य लोकांना आराम देण्यासाठी सोलर होम लाइटिंग सिस्टम आणली असून राज्यातील सर्व जिल्ह्यात या योजनेद्वारे जवळपास ७० टक्के सबसिडी देण्याचा सरकारचा मानस आहे.
या योजनेत सहभागी होणाऱ्या तसेच पात्र असणाऱ्या नागरिकांना १५० व्हॅटचे एक सोलर मोडयूल, ८० एएच -१२.८ वोल्ट लिथियम बॅटरी , २ एलईडी लाइट, एक ट्यूबलाईट आणि एका पंखा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वीज बचत होणार आहे.
कोणत्या व्यक्ती अर्ज करू शकतात
१) ज्यांच्या घरात वीज नाही असे व्यक्ती
२) अनुसूचित जाति परिवार
३) दारिद्र रेषेखालील नागरिक
४) प्रधानमंत्री आवास योजनाचा लाभ घेणाऱ्या व्यक्ती
५) शहरातील महिला वस्तीत राहणारा मात्र घरात वीज नसणारा परिवार
६) परिवाराची प्रमुख महिला असलेला परिवार
७) ग्रामीण घरातील कॉलेजमध्ये जाणारी विद्यार्थिनी
असा करु शकता अर्ज
बाजारात सोलर होम सिस्टमची किंमत २२,५०० रुपये आहे परंतु, हरियाणा सरकार यावर १५ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देत आहे. त्यामुळे तुम्हाला केवळ यासाठी साडेसात हजार रुपये खर्च करण्याची गरज आहे.
ही महत्त्वाची कागदपत्रे हवी
हरियाणा सरकारच्या या ‘मनोहर ज्योति होम लाइटिंग सिस्टम योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल, दारिद्र रेषेखालील रेशनकार्ड,अनुसूचित जाति प्रमाण पत्र आणि बँकेचे पासबुक आवश्यक आहे.