मुंबई बहुजननामा : उपनगरीय रेल्वे , मेट्रो – मोनो रेल्वे आणि बेस्ट ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यांसारख्या प्रवासासाठी तुम्हाला आता वेगवेगळे तिकीट खरेदी करण्याची गरज नाही. नोव्हेंबर मध्ये बेस्ट हे प्रायोगिक तत्वावर ‘स्मार्ट कार्ड ‘ प्रणाली सुरु करणार आहे. शुक्रवारी ७ ऑगस्ट रोजी ‘बेस्ट डे’ साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती बेस्ट जे जनरल मॅनेजर सुरेंद्र कुमार बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, मुंबई रेल्वे विकास निगम ने अधिकृत तिकीट प्रणाली च्या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यासाठी रेल्वे निगम ला पाठवली आहे. रेल्वे निगम ने देखील याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली असून बेस्ट ने देखील हि सिस्टिम आमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
हि सुविधा बेस्ट प्रवाशांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात याला सुरुवात केली जाईल. हि सुविधा सध्या तरी काही बसेससाठीच मर्यादित आहे. जर उपनगरीय रेल्वे , मेट्रो – मोनो रेल्वे यांनी आपल्या तांत्रिक अडचणी दूर केल्या तर, ह्या स्मार्ट कार्ड सुविधेचा उपयोग त्यांना देखील करण्यात येईल. या स्मार्ट कार्ड च्या आधारे प्रवाशांना तिकीट काढता येईल.