नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने आपल्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागात काम करणाऱ्या अनियमित (प्रासंगिक/कॅज्युअल) कर्माचाऱ्यांचे दिवाळी साजरी करण्यासाठी आताच व्यवस्थापन केले आहे. सर्व अनियमित कर्मचाऱ्यांना आता नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन मिळणार आहे. पंतप्रधान कार्यालयातील कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने बुधवारी यासंदर्भात आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आता सर्व अनियमित कर्मचाऱ्यांना 8 तास काम केल्यानतंर त्याच पदावर कार्यरथ असणाऱ्या नियमित कर्मचाऱ्याच्या वेतनश्रेणीच्या किमान मूलभूत वेतन आणि महागाई भत्त्याएवढेच वेतन मिळणार आहे. जे जितके दिवस काम करतात त्यांना तितक्याच दिवसांचा पगार मिळणार. आदेश क्रमांक 49014/1/2017 नुसार त्यांना नियमित पगाराचा हक्क मिळणार नाही.
सध्या या कर्मचाऱ्यांना संबंधित राज्य सरकारने घोषणा केलेले किमान वेतन मिळत आहे. दिल्ली सरकारने अकुशल कामगारांसाठी 14000 रुपये महिना वेतन निश्चित केलं आहे. परंतु या नव्या आदेशानंतर त्यांना ग्रुप डीच्या वेतनश्रेणीत किमान वेतन म्हणजेच 30000 रुपये प्रतिमहिना मिळणार आहे. म्हणजेच एकाच टप्प्यात त्यांची कमाई दुप्पट होणार.
आदेशात हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे की, अनियमित कर्मचाऱ्यांचे काम नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळे असेल तरीही सरकारने निश्चित केलेल्या किमान वेतनाच्या आधारावरच वेतन दिले जाणार आहे. सर्व मंत्रालय आणि विभागांना पाठवलेला डीओपीटीचा हा आदेश समान ‘कामासाठी समान वेतन’ या आधारावर दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पाठवण्यात आला आहे. सरकारने दिलेल्या स्पष्ट आदेशानंतरही कामगार संघटनांचे नेते त्याच्या अंमलबजावणीवर शंका घेत आहेत. देशातील सर्वात मोठी कामगार संघटना भारतीय कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष बैजनाथ राय यांचं म्हणणं आहे की, “यासारखे अनेक आदेश आधाही देण्यात आले होते परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नव्हती.”
दरम्यान सरकारने आता ग्रुप सी आणि डी मधील बहुतेक नोकर्या खाजगी कंत्राटदारांना दिल्या असल्याने आदेशाची अंमलबजावणी करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. सीटूचे नेते तपन रॉय म्हणतात की, “हे फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आहे म्हणून डीओपीटीने हा आदेश दिला आहे. जर श्रम मंत्रालयाने हा आदेश दिला असता तर सर्व कर्मचाऱ्यांसाठी असला असता.” रॉय यांनीही या आदेशाच्या अंमलबजावणीवर शंका व्यक्त केली आहे.
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय
- वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप
- अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अॅसिडिटी