नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे अमेरिकन सरकारने भारताच्या एच-१ बी व्हिसा होल्डर्स आणि ग्रीन कार्ड अर्जदारांना अमेरिकेत ६० दिवस एक्सट्रा थांबण्याची परवानगी दिली आहे. ज्यांना कागदपत्र सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती त्यांना ही सूट देण्यात आली आहे. अमेरिकन सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसने शुक्रवारी घोषणा केली की ६० दिवसांचा ग्रेस पिरियड वाढवून एच-१ बी व्हिसाहोल्डर्स आणि ग्रीन कार्ड अर्जदारांना सवलत दिली आहे.
६० दिवसांच्या आत Form I-290B भरणे आवश्यक
मीडिया रिपोर्टनुसार, यूएससीआयएसचे म्हणणे आहे की, ही सूट यासाठी दिली आहे जेणेकरुन कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान लोक त्यांच्या नोटिसमध्ये दिलेल्या विनंतीला आरामात प्रतिसाद देऊ शकतील आणि फॉर्म I-290B भरू शकतील. यूएससीआयएस एच-१ बी व्हिसाधारक आणि ग्रीन कार्ड अर्जदारांवर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी ६० दिवसांच्या आत मिळणाऱ्या फॉर्म I-290B वर विचार केला जाईल.
महामारी दरम्यान आलेल्या संकटात इमिग्रेशनचा फायदा घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी यूएससीआयएस इमिग्रेशन दरम्यान येणाऱ्या समस्या कमी करत आहे. अमेरिकेतील कोरोना विषाणू महामारीमुळे व्यवसायांवर होणारा परिणाम एच-१ बी व्हिसा धारकांवर परिणाम करत आहे, ज्यामुळे त्यांचा व्हिसा धोक्यात येऊ शकतो. अमेरिकेत सुमारे २ लाख लोक एच-१ बी व्हिसावर आहेत आणि ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मागच्या दोन महिन्यात, लाखो अमेरिकन नागरिकांनी गमावल्या आहेत आपल्या नोकऱ्या
गेल्या दोन महिन्यांत, लाखो अमेरिकन नागरिकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. मात्र, व्हिसावर काम करणाऱ्या लोकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. कारण एच १ – बी व्हिसा लोकेशन आणि एम्प्लॉयरशी जोडलेला आहे, ज्यामध्ये ते प्राप्तकर्त्यास मूलभूत वेतन देण्यास सहमत आहे. वेतन कपात आणि अगदी वर्क फ्रॉम होम हे देखील व्हिसा नियमांच्या विरोधात आहे. आता ज्या एच-१ बी कामगारांना काढून टाकले आहे, त्यांच्याकडे नवीन नोकरी शोधण्यासाठी ६० दिवस आहेत. या काळात जर त्यांना नोकरी सापडली नाही किंवा ते वेगळ्या व्हिसा प्रकारात शिफ्ट झाले नाहीत तर त्यांना घरी परत जावे लागेल.
एनपी न्यूज 24 नेटवर्क