नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय कर्मचार्यांसाठी (central employees) एक चांगली बातमी आहे. घर बांधण्याची योजना आखत असलेले कर्मचारी 31 मार्च, 2022 पर्यंत हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स (HBA) घेऊ शकतात. ही योजना 1 ऑक्टोबरला सुरू झाली होती.
या अंतर्गत केंद्र सरकार 31 मार्चपर्यंत आपल्या कर्मचार्यांना 7.9 टक्के व्याजदरावर हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स देत आहे. good news for central employees cheap advance for building a house will continue till next year
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
7.9 टक्केच्या दराने साधारण व्याज
7व्या वेतन आयोग (7th Pay commission) च्या शिफारसी आणि HBA (House Building Advance) नियमांनुसार,
केंद्र सरकारचे कर्मचारी नवीन घराचे बांधकाम किंवा नवीन घर-फ्लॅट खरेदी करण्यासाठी 34 महिन्यांचे मुळ वेतन,
कमाल 25 लाख रुपये किंवा घराच्या किंमत किंवा अॅडव्हान्स परतफेड करण्याच्या क्षमता पैकी जे सुद्धा कमी असेल तेवढी रक्कम अॅडव्हान्स घेऊ शकतात.
अॅडव्हान्सवर 7.9 टक्केच्या दराने साधारण व्याज लागेल.
घराच्या विस्तारासाठी 10 लाख
House Building Advance Rules नुसार घराच्या विस्तारासाठी कमाल दहा लाख रुपये अॅडव्हान्स घेऊ शकतात.
ही रक्कम मूळ रक्कम म्हणून पहिल्या पंधरा वर्षात किंवा 180 महिन्यापर्यंत वसूल केली जाईल. बाकी पाच वर्ष म्हणजे 60 महिन्यात व्याज म्हणून इएमआयमध्ये वसूल केली जाईल.
अॅडव्हान्सवर 7.9 टक्केच्या दराने साधारण व्याज लागेल.
अॅडव्हान्स घेऊन फेडू शकतो होम लोन
नवीन घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट किंवा घर बांधण्यासाठी बँकेतून धेतलेले कर्ज सुद्धा तुम्ही अॅडव्हान्स घेऊन शकता.
हे अॅडव्हान्स स्थायी आणि अस्थायी कर्मचार्यांना सुद्धा मिळेल. परंतु अस्थायी कर्मचार्यांची नोकरी लागोपाठ पाच वर्ष झालेली असावी.
कर्मचार्यांना त्याच दिवसापासून हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स मिळेल ज्या दिवसापासून त्यांनी बँक आणि इतर दुसर्या आर्थिक संस्थांकडून कर्ज घेतले आहे.
जरी तुम्ही घर बांधण्यासाठी अॅडव्हान्ससाठी अगोदर अर्ज केला असेल परंतु ही रक्कम त्याच दिवशी मिळेल, ज्या दिवसापासून तुम्हाला कर्ज दिले गेले आहे.
बँक-रिपेमेंटसाठी अॅडव्हान्स एकरक्कमी मिळेल.
मात्र, अॅडव्हान्स जारी होण्याच्या एक महिन्या आत कर्मचार्यांना HBA Utilization Certificate जमा करावा लागेल.
Web Title : good news for central employees cheap advance for building a house will continue till next year
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या