बहुजननामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत वधारल्याने आणि कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे देशांतर्गत सराफा बाजारात सलग दुसर्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत २१५ रुपयांनी घसरून ३८,६७६ रुपये झाली. सोन्यासह चांदीची किंमत ७७० रुपयांनी घसरली आहे. या किंमतीत घट झाल्यामुळे देशाच्या राजधानीत एक किलो चांदीची किंमत आता ४७,६९० रुपयांवर पोहोचली आहे.
सोने का स्वस्त झाले –
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार बुधवारी (ता.१८) कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे रुपयाच्या किमतीत वाढ झाली आणि या वाढीमुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या. जागतिक पातळीवरील किमतीबाबत बोलताना ते म्हणाले की, न्यूयॉर्कमध्ये बुधवारी सोने प्रति तोळा १५०० डॉलर्स आणि चांदीची किंमत १७.८१ डॉलर प्रति तोळावर बंद झाली.
दोन दिवसांत सोने ३०० रुपयांनी स्वस्त झाले
सलग दोन दिवसांत सोन्याचे दर दहा ग्रॅम ३६५ रुपयांनी स्वस्त झाले तर मंगळवारी (ता.१७ ) सोन्याच्या किंमती १५० रुपयांनी घसरल्या आणि बुधवारी (ता.१८) २१५ रुपयांनी घसरल्या. अशा प्रकारे दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत ३६५ रुपयांची घट झाली. कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात एका डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ३५ पैशांनी वधारल्याने ७१.४३ वर व्यवहार सुरु होता.
गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली
भारतीयांनी दागिन्यांव्यतिरिक्त गेल्या एका महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये (एक्सचेंज ट्रेडेड फंड) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आकडेवारीनुसार, ईटीएफमध्ये ऑगस्ट महिन्यात १४५ कोटींची निव्वळ गुंतवणूक झाली आहे.नऊ महिन्यांत पहिल्यांदाच गोल्ड ईटीएफमध्ये इतकी गुंतवणूक दिसून आली. सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे सोन्याच्या ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. गुंतवणूकदारांचा हा एक सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय आहे.
Visit: bahujannama.com