बहुजननामा ऑनलाइन टीम – आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्या चांदीच्या दरात तेजी आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले असून रुपया घसरला आहे. यामुळे दिल्ली सराफ बाजारात सोनं 187 रुपयांनी महागले. तर चांदी देखील महागली असून चांदीचे दर 495 रुपयांनी वाढले.
सोन्याचे दर –
सोमवारी दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 39,053 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, सोमवारी न्यूयॉर्कमध्ये सोनं 1,484 डॉलर प्रति औंस झाले. तर चांदी 17.36 डॉलर प्रति औंस झाली.
चांदीचे दर –
औद्योगिक क्षेत्रात मागणी वाढल्याने दिल्ली सराफ बाजारात चांदीचे दर 46,499 रुपये प्रति किलो ग्रॅम झाले.
का वाढले सोन्या चांदीचे दर –
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर एनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की नाताळाच्या सुट्यामुळे बाजारात अनिश्चितता आली आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूकीच्या रुपात सोन्यामध्ये गुंतवणूक केली जात आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी आणि रुपया कमकुवत झाल्याने परिणाम होत आहे.
नव्या वर्षात सोनं 1500 रुपयांनी होऊ शकतं स्वस्त –
नव्या वर्षात म्हणजेच 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीत होणारी वाढ स्थिरावू शकतो. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून हे दिसत आहे. सोनं 6 टक्क्यांनी स्वस्त झालं. तज्ज्ञांच्या मते रुपया मजबूत आणि अमेरिका – चीनच्या दरम्यान सुरु असलेल्या व्यापार करारानुसार सोनं यानंतर देखील स्वस्त होऊ शकते.