बहुजननामा ऑनलाइन टीम – डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून मदत पॅकेजची अपेक्षा वाढल्याने परदेशी बाजारात सोने-चांदी (Gold Silver Rate ) मध्ये खालच्या स्तरावरून रिकव्हरी नोंदली जात आहे. डॉलर इंडेक्स दोन महिन्याच्या उंचीवरून घसरला आहे आणि यामुळे सोने-चांदी (22ct Gold Rate) ला सपोर्ट मिळाला आहे.
जगातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाची वाढती प्रकरणे, ब्रेक्सिट आणि अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे सोने-चांदीला सपोर्ट मिळत आहे. आजच्या व्यवहारात सोने-चांदीमध्ये ट्रेडिंगसाठी कोणती रणनीती बनवली पाहिजे, याविषयी दिग्गज तज्ज्ञांचे मत जाणून घेवूयात…
सोने-चांदीवर तज्ज्ञांचे मत
पृथ्वी फिनमार्ट प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर (कमोडिटी अँड करन्सी) मनोज कुमार जैन यांच्यानुसार, एमसीएक्सवर सोन्याचा भाव 50,100 रुपयांच्या वर टिकल्यास 50,330-50,500 रुपयांच्या वरील पातळी गाठू शकतो. सोन्यात 49,800 रुपयांचा स्टॉपलॉस लावू शकता. चांदी 60,220 रुपयांच्या वर टिकल्यास 60,800-61,500 रुपयांच्या वरील पातळी गाठू शकते. चांदी वायदामध्ये 59,200 रुपयांचा मजबूत सपोर्ट आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आजच्या सत्रात सोने-चांदीत चढ-उतार राहण्याची शक्यता आहे.
मोतीलाल ओसवालचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडंट (कमोडिटी अँड करन्सी) अमित सजेजा यांच्यानुसार आजच्या व्यवसायात एमसीएक्सवर सोने ऑक्टोबर वायदामध्ये 49,800 रुपयांच्या भावावर खरेदी करून 50,300 रुपयांचे लक्ष्य गाठू शकता. सोन्याच्या या कॉन्ट्रॅक्टसाठी 49,600 रुपयांचा स्टॉपलॉस लावू शकता. तर चांदी डिसेंबर वायदा बाजारात 61,200 रुपयांच्या लक्ष्यासाठी 59,900 रुपयांच्या भावावर खरेदी केली जाऊ शकते. चांदी डिसेंबर वायदामध्ये 59,200 रुपयांचा स्टॉपलॉस लावू शकता.
एंजल ब्रोकिंगचे डेप्युटी व्हाईस प्रेसिडंट (एनर्जी आणि करन्सी) अनुज गुप्ता यांच्यानुसार इंट्राडेमध्ये एमसीएक्सवर सोन्यात 50,800 रुपयांच्या लक्ष्यासाठी 50,000 रुपयांच्या भावावर खरेदीने फायदा आहे. सोन्याच्या या कॉन्ट्रॅक्टसाठी 49,600 रुपयांचा स्टॉपलॉस लावू शकता. दूसरीकडे चांदी डिसेंबर वायदामध्ये 60,000 रुपयांच्या भावावर खरेदी करून 61,300 रुपयांचे लक्ष्य मिळवू शकता. चांदीच्या या कॉन्ट्रॅक्टसाठी 59,000 रुपयांचा स्टॉपलॉस लावू शकता.
कार्वी कॉमट्रेडचे हेड रिसर्च वीरेश हीरेमठ यांच्यानुसार आजच्या व्यवसायात एमसीएक्सवर सोने ऑक्टोबर वायदात 51,300 रुपयांच्या लक्ष्यासाठी 50,050 रुपयांच्या भावावर खरेदी करू शकता. सोन्याच्या या सौद्यासाठी 49,900 रुपयांचा स्टॉपलॉस लावू शकता. तर दुसरीकडे चांदी डिसेंबर वायदामध्ये 60,200 रुपयांच्या भावावर खरेदी करून 60,800 रुपयांचे लक्ष्य गाठू शकता. चांदीच्या या कॉन्ट्रॅक्टसाठी 59,900 रुपयांचा स्टॉपलॉस लावला पाहिजे.
केडिया अॅडवायजरीचे मॅनेजिंग डायरेक्टर अजय केडिया यांच्यानुसार इंट्राडेमध्ये एमसीएक्सवर सोने ऑक्टोबर वायदा 50,350-50,600 रुपयांच्या लख्यासाठी 50,000 रुपयांच्या भावावर खरेदी करू शकता. सोन्याच्या या सौद्यासाठी 49,700 रुपयांचा स्टॉपलॉस लावू शकता. चांदी डिसेंबर वायदामध्ये 60,250 रुपयांच्या भावावर खरेदी करून 61,000-61,600 रुपयांचे लक्ष्य गाठले जाऊ शकते. चांदीच्या या सौद्यासाठी 59,600 रुपयांचा स्टॉपलॉस लावू शकता.