नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील कोरोना व्हायरसचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थेवर दिसून येत असून गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी सोन्याची खरेदी सुरु केली आहे. यामुळे देशांतर्गत सोन्याचे भाव वाढले असून दोन दिवसात कमी झालेल्या किंमतीनंतर प्रति १० ग्राम सोन्याच्या किंमतीत ७८ रु.ने वाढले असता प्रति १० ग्राम ४३,५१३ रु. किंमत झाली आहे. दोन दिवस अगोदर सोन्याचा भाव १००० रुपये प्रति १० ग्रामपर्यंत स्वस्त झाले होते.
काय आहे सोन्याचा नवीन भाव ? –
दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी ९९.९ टक्के शुद्ध सोन्याच्या १० ग्रामची किंमत ४३,४३५ रुपयांनी वाढून ४३,५१३ रु. प्रति १० ग्राम झाली आहे. याअगोदर बुधवारी दिल्लीत सोन्याचा भाव ४३,५०२ रु. प्रति १० ग्राम असताना मंगळवारी सोन्याचा भाव ४३,५६४ रु. प्रति १० ग्राम बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १,६४९ डॉलर प्रति औस आणि चांदी १८.०५ डॉलर प्रति औस होता.
चांदीची नवीन किंमत –
चांदीच्याही किंमतीत वाढ झाली असून गुरुवारी १ किलोग्रॅम चांदीच्या दरात ३५ रु. वाढ झाली असून ४८,१३० रु.वर पोहोचले आहे. दुसरीकडे बुधवारी दिल्लीच्या सराफ बाजारात चांदीची किंमत ४८,१४६ रु. प्रति किलोग्रॅम होती. मंगळवारी चांदीची किंमत ४८,९७४ रु. प्रति किलोग्रॅम होती.
पुढे काय ?-
एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनियर अनॅलिस्ट तपेल पटेल यांचे म्हणणे आहे की, सेफ इन्व्हेस्टमेंटसाठी डिमांड असून सोन्याची किंमत वाढली आहे. आता मात्र किंमत अजून वाढण्याची शक्यता नाही.
केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया यांनी जर कोणाची इन्व्हेस्टमेंट असेल तर त्यांनी नफावसुली केली पाहिजे आणि सोन्याच्याऐवजी आता चांदीत वेगाने पैसे मिळायची संधी मिळू शकते. कारण सोन्या-चांदीचे प्रमाण वाढले आहे, असे त्यांनी एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना सांगितले.
सोप्या शब्दात सांगायचे तर सोन्या-चांदीच्या किंमतीचे प्रमाण २०१० साली खाली गेल्यांनतर अधिकच वाढत आहे. सध्या हे प्रमाण ८६ पेक्षा जास्त आहे. अजय केडिया यांनी सांगितले की, जेव्हा सोने-चांदीच्या किंमतीचे प्रमाण वाढते तेव्हा ते कोणत्या तरी संकटाची माहिती मिळते.
सामान्य शब्दात जर प्रमाण ८० च्या वर असेल तर ते जास्त मानले जाते. मागच्या वर्षीच्या सरासरी ८२ पेक्षा जास्त राहिले आहे. हे प्रमाण एक औस सोन्याने किती औस चांदी खरेदी केली जाऊ शकते, हे सांगते.
त्यांचे म्हणणे आहे की, सोने-चांदीच्या किंमतीच्या प्रमाणातील वाढ जास्त काळ राहणार नाही. सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण होण्याचा अंदाज आहे. जर तुम्ही कोणत्याही मोठ्या आपत्कालीन परिस्थितीत फसले नाहीत तर ज्वेलरीमध्ये गुंतवणूक करत राहा.