Gold-Silver Rate Today | पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Gold-Silver Rate Today | साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा (Gudipadva) सण आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. गुढीपाडव्याला सोने खरेदीचा मुहूर्त मानला जातो. मात्र सध्या सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ झाल्याने यंदाच्या पाडव्याला सोनं खरेदीला कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागलं आहे. आज पुण्यात सोनं आणि चांदीच्या दरात (Gold-Silver Rate Today) प्रत्येकी एक हजार रुपयांची घसरण झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यात मंगळवारी (दि.21) 24 कॅरेट सोन्याचा दर 61 हजार 079 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55 हजार 989 रुपये प्रति तोळा इतका होता. तर पुण्यात आज (बुधवार) 24 कॅरेज सोन्याचा दर 60 हजार 155 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55 हजार 142 रुपये प्रती तोळा इतका आहे. आज एक ग्रॅम 24 कॅरेटचा सोन्याचा दर 6015 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 5514 इतकी आहे.
पुण्यात चांदीच्या दरात (Gold-Silver Rate Today) देखील घसरण झाली आहे. आज चांदी 1 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. पुण्यात आज चांदी 72 हजार रुपये प्रतीकिलो दराने विकली जात आहे. पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये जुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि इतर कारणांमुळे बदल होऊ शकतो.
सोन्याची शुद्धता कशी ओळखावी
24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (22 Carat Gold) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Gold-Silver Rate Today | gudi padwa 2023 gold silver rate today in pune wednesday 22 march 2023
हे देखील वाचा :
Pune Crime News | कात्रज परिसरात दहशत निर्माण करणार्या गुंडांच्या टोळीवर ‘मोक्का’
Comments are closed.