बहुजननामा ऑनलाईन : अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय रुपया कमकुवत झाला आहे. याचा परिणाम आज देशांतर्गत सराफा बाजारात दिसून आला. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 122 रुपयांची वाढ झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीची किंमत 340 रुपयांनी वाढली आहे. दरम्यान, तज्ञांचे मत आहे की, देश आणि जगात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढत आहेत तर दुसरीकडे अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढत आहे. तसेच भारत आणि चीनसारख्या मोठ्या बाजारात ग्राहकांची मागणी खूपच कमकुवत आहे.
सोन्याचे नवीन भाव – सोमवारप्रमाणे मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 51,867 रुपयांवरून वाढून 51,989 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे. या काळात दर दहा ग्रॅमच्या किंमती 122 रुपयांनी वाढल्या आहेत.
चांदीच्या नवीन किंमती – सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलोग्रॅम चांदीचा भाव प्रति दहा ग्रॅम 69,325 रुपयांवरून वाढून 69,665 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
सोन्यावर मिळू शकते भारी सूट
गेल्या महिन्यात 7 ऑगस्ट रोजी सोन्याने सर्वाधिक पातळी गाठली आणि दर दहा ग्रॅमची किंमत 56,200 रुपये होती. त्यानंतर महिन्याभरात सोन्याच्या किंमती सुमारे 5500 रुपयांनी खाली आल्या आहेत. म्हणजेच एका महिन्यात सोन्याच्या किंमतीत 10 टक्क्यांनी घट झाली. म्हणजेच सोन्याच्या किंमतींमध्ये इतकी घसरण झाली आहे की ही सोन्याची खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.
एवढ्या मोठ्या घसरणीनंतही व्यापाऱ्यांनी सूट देणे बंद केले नाही. ऑगस्ट महिन्यात डीलर्सनी ग्राहकांना मोठी सूट दिली आहे. गेल्या व्यावसायिक आठवड्यातही ग्राहकांना 40 डॉलर प्रति औंसपर्यंत सूट मिळाली आहे. सोन्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार देखील हे एक कारण असू शकतात. दरम्यान भारतात 12.5 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी सोन्याच्या किंमतींशी जोडलेले आहेत.