मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Gold-Silver Rate Today | पौष महिना सरताच सगळीकडे लग्नसराईला सुरुवात होते. त्यामुळे बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते. मात्र मागील काही दिवसांपासून सोन्य-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate Today) मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळतेय. परंतु आज सोन्याचे दर स्थिर आहेत. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर (24 Carat Gold) आता स्थिरावले आहेत. सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56 हजार 730 रुपये आहे. तर चांदी 72 हजार 200 रुपये प्रति किलो दर आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जागतिक बाजारात सध्या वाढत चाललेली महागाई आणि त्यानंतर आगामी काळात मंदीची लाट येण्याचा अंदाज पाहता अनेकांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोनं खरेदीकडे कल वाढवला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे. तसेच सुवर्णनगरी जळगावातही सोन्याच्या दराने (Gold-Silver Rate Today) मोठी उच्चांकी पातळी गाठली आहे. जळगावात 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजारांच्याही पुढे गेला आहे.
आजचे 24 व 22 कॅरेट सोन्याचे दर
अमरावती – 24 कॅरेट 56,600 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट -52,990 रुपये 10 ग्रॅम तर चांदी 69,000 रुपये प्रतिकिलो
सोलापूर – 24 कॅरेट 56,834 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट -52,096 रुपये 10 ग्रॅम तर चांदी 67,977 रुपये प्रतिकिलो
वर्धा – 24 कॅरेट 56,490 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट -53,310 रुपये 10 ग्रॅम तर चांदी 68,180 रुपये प्रतिकिलो
मुंबई – 24 कॅरेट 53,400 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट -45,400 रुपये 10 ग्रॅम
नागपूर – 24 कॅरेट 56,900 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट -54,100 रुपये 10 ग्रॅम तर चांदी 69,400 रुपये प्रतिकिलो
सांगली – 24 कॅरेट 56,900 रुपये 10 ग्रॅम, 22 कॅरेट -52,580 रुपये 10 ग्रॅम तर चांदी 69,000 रुपये प्रतिकिलो
Web Title :- Gold-Silver Rate Today | gold and silver rate check 19 jan rate today
हे देखील वाचा :
Pune Crime News | पीएमपीएमएल बसमध्ये चोरी करणार्या सराईताला अटक, मुद्देमाल जप्त