मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोन्यामध्ये Gold गुंतवणूक वाढली आहे. जर तुम्ही आज सोनं Gold खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी (दि.28) मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं Gold आणि चांदीच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे.
MCX वर सोन्याच्या जूनच्या वायदा दरांमध्ये 0.28 टक्क्यांनी घट दाखवली आहे. तर जुलैच्या दरांमध्ये 0.47 टक्क्यांची घट दाखवण्यात आली आहे. शुक्रवारी MCX वर सोन्याचा नवा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 136 रुपयांनी खाली आला आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी शुक्रवारचा दर 48 हजार 445 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे.
देशामध्ये सोन्याच्या दरात मार्च महिन्यात मोठी घसरण झाली होती. मार्चमध्ये सोन्याचा प्रति 10 ग्रॅमसाठी दर 44 हजारांवर आला होता. त्यानंतर जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे आणि महागाईत वाढ झाल्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर झाला. त्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतली. गेल्या ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा दर तब्बल 56 हजार 200 एवढ्या विक्रमी किमतीवर पोहोचला होता. त्यांनंतर आता या किमतीत तब्बल 8 हजारांची घट झाली आहे.
सोन्याच्या दरात घसरण सुरु असताना चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. MCX वर जुलैच्या दरात 334 रुपयांची घट होऊन प्रति एककिलोसाठी 71 हजार 385 रुपयांवर ट्रेंड करत आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात 319 रुपयांची घट नोंदवण्यात आली होती. तर चांदीच्या दरात 1278 रुपयांची घट नोंदवण्यात आली.
दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा दर 48 हजार 223 रुपये इतका नोंदवण्यात आला. तर चांदीचा दर 70 हजार 637 रुपये प्रतिकिलो नोंदवण्यात आला आहे. आगामी काळात सोन्याच्या किंमतीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा मार्ग चांगला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.