बहुजननामा ऑनलाइन टीम : सोमवारी दिल्लीत सराफ बाजारात सोन्याचे भाव १६१ रुपयांनी घसरले आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीत देखील घसरण आली आहे. चांदी देखील आज ४२५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. तज्ज्ञांच्या मते मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.
सोन्याचा दर
सोमवारी दिल्लीत सराफ बाजारात सोने ३८,७१८ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १,४५६ डॉलर प्रति औंस आणि चांदी १६.८४ डॉलर प्रति औंस झाले आहे.
चांदीचे दर
चांदिच्या दरात देखील घसरणं आल्याने चांदी ४६,१५५ रुपयांनी घसरुण ४५,७३० रुपये झाली आहे. औद्योगिक क्षेत्रात आणि शिक्के बाजारात मागणी कमी झाल्याने चांदीच्या भावात घसरणं आली आहे.
घसरणीचे कारण
HDFC सिक्युरिटीजचे सीनियर एनालिस्ट(कमोडिटी) तपन पटेल म्हणाले की, डॉलरमध्ये मजबूती आणि चीनमध्ये सकारात्मक मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय डेटा आल्यानंतर जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीत घसरणं आली आहे.
सरकारने बदलले सोन्याच्या दागिणे खरेदीचे नियम
भारतात आतात सोन्याच्या दागिण्याच्या खरेदीसाठी BIS हॉल मार्किंग अनिवार्य (BIS Hallmarking for Gold Jewelry) करण्यात आले आहे. केंद्र सरकारने १५ जानेवारी २०२० ला सूचना जारी केली आहे. ही अधिसूचना जारी केल्यानंतर १५ जानेवारी २०२१ ला सोन्याच्या दागिण्यांवर BIS हाल मार्किंग अनिर्वाय असेल. जर सराफ या नियमांकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याला १ लाख रुपयांचा दंड आणि १ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात येईल. याशिवाय दंड म्हणून सोन्याच्या रक्कमेच्या पाच पट अधिक रक्कम देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com