मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – Gold and Silver Prices |मागील काही दिवसांपासून घसरणारे सोन्या-चांदीचे दर (Gold and Silver Prices) पुन्हा वाढू लागले आहेत. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याची सांगता सोन्या-चांदीच्या दरातील तेजीनं झाली. शेअर बाजारात सोनं आणि चांदी यांचा भाव वधारला आहे. (Price Gained) आणि चढ्या दरावरच बाजार बंद झाले. सोन्या-चांदीच्या दरात वाढ (Gold and Silver Prices) होत असल्याने गुंतवणुकीसाठी (investment) हीच योग्य वेळ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जागतिक बाजारात तेजी
जागतिक बाजारातील (global market) तेजीसह सराफा बाजारत सोन्याचा भाव 256 रुपयांनी वधारुन 46,698 रुपयांवर बंद झाला. तर चांदीच्या भावात 662 रुपयांची वाढ झाली. चांदीचा सध्याचा दर (Silver rate) 66,111 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या वर्षी सोन्या-चांदीच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर हे दर काहीसे घसरले होते. परंतु आता पुन्हा एकदा दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यामुळे वाढले दर
अमेरिकेत आर्थिक गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी झाल्याने जगभरात सोने आणि चांदीचे भाव वाढू लागल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे (HDFC Securities) ज्येष्ठ विश्लेषक तपन पटेल (Tapan Patel) यांनी सांगितले आहे. आर्थिक गुंतवणुकीवरील परतावा कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक अधिक प्रमाणात करु लागले आहे. परिणामी सोन्याला मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे याचा परिणाम सोन्याच्या बाजारभावावर होत आहे.
सोन्याचे दर वाढतच राहणार
सोन्याच्या दरात वाढ होण्याचा हा सिलसिला येथून पुढे काही दिवस सुरु राहिल, असा अंदाज अर्थविश्वातून व्यक्त करण्यात येत आहे. सोन्यातील गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ असून अल्पावधीत सोन्यातील गुंतवणुक चांगला नफा मिळवून देऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. परंतु कोणत्याही फसव्या सल्ल्याला बळी पडू नये, असेही आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
web title: Gold Silver Prices Today | gold and silver prices rised in market.
Varsha Gaikwad | यंदाही शाळेच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
Bicycle thief |पुण्यातील सायकलचोर ‘आशिक’ पोलिसांच्या जाळ्यात, जाणून घ्या प्रकरण