नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने – चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून रुपया मजबूत असून जागतिक बाजारात बिकवाली सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ९५४ रुपयांनी खाली आला असून सोमवारीच सोन्याचा भाव आजपर्यंत सर्वात जास्त म्हणजे ४४,५०३ रुपये इतका होता.
काय आहे सोन्याचा नवीन भाव ?
मंगळवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर ४४,५०३ रु. असताना तो खाली येत ४३,५४९ रु. प्रति १० ग्रॅम झाला आहे. यादरम्यान किमतींमध्ये ९५४ रु. घसरण झाली आहे. दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ शुद्धीचे सोने ७७० रु. नी खाली आले असून ४४,०३० रु. प्रति १० ग्रॅम ४३,८८० रु. प्रति १० ग्रॅम झाला आहे.
चांदीचे नवीन भाव –
दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीची किंमत ५०,०७० रु. नी घसरली असून चांदी ४९,९९० रु. प्रति किलोग्रॅम झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,६४८ डॉलर प्रति औस आणि चांदीचा भाव १८.४० डॉलर प्रति औस आहे.
का घसरल्या किंमती ?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, जागतिक बाजारपेठेतील किंमती कमी झाल्याने आणि रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमती देशांतर्गत बाजारात घट झाली आहे. मंगळवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया १६ पैशांच्या बळावर व्यापार करत असून सुरुवातीच्या व्यापारात रुपया डॉलरच्या तुलनेत १८ पैशांनी वाढून ७१.८० वर पोहोचला. जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होण्याच्या चिंतेमुळे सोन्याच्या किंमती जास्त घसरणार नाहीत, असेही ते म्हणाले.