बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसामध्ये सोन्याचा दरात घसरण दिसून येत होती. मात्र अनेक दिवस सोनं स्वस्त झालं होत. मात्र आज मंगळवारी सोन्याचे दर वधारले आहे. सोनं प्रति १० ग्रॅम मध्ये ४० रुपयांनी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ४५,७५० रुपये आहे. तसेच चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज गुढीपाडवा अर्थात नूतन वर्षाच्या मुहूर्तावर अनेक लोक सोनं खरेदी करतात. मात्र सोन्याचा दर कितीही असला तरी लोक परंपरेला पसंती देत असतात.
सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सराफ व्यापारी यांच्यात आनंदी वातावरण झालं आहे. तर मागील काही दिवसात सोन्याने ५० हजाराचा टप्पा ओलांडला होता. परंतु आताचा भाव म्हणजे सोन्याच्या पूर्वीच्या दरापेक्षा दहा हजार रुपयांनी उतरला आहे. यापृवी ही घसरण १२ हजार रुपयांपर्यंत गेली होती. नंतर काही दिवसात आणखी २ हजार रुपयांनी भाव वाढला आहे. तसेच सोमवारी याचा दर प्रति १० ग्रॅम तोळा ४६५९७ इतका झाला आहे. तसेच चांदी प्रति किलोमागे ३०० रुपये महाग झाली आहे. तर चांदीची किंमत ६७,२०० रुपये प्रति किलो झाली आहे.
जाणून घ्या काय आहेत आजचे दर –
दिल्ली :
२२ कॅरेट – ४५,७०० रुपये
२४ कॅरेट – ४९,८६० रुपये
मुंबई :
२२ कॅरेट – ४४,७५० रुपये
२४ कॅरेट – ४५,७५० रुपये
कोलकत्ता :
२२ कॅरेट – ४५,८५० रुपये
२४ कॅरेट – ४८,५५० रुपये
चेन्नई :
२२ कॅरेट – ४३,८०० रुपये
२४ कॅरेट – ४७,७८० रुपये