नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold-Silver Price Today | सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये (Gold-Silver Price Today) सातत्याने झालेल्या घरसणीनंतर चालू आठवड्यात सोन्याचे दर वधारले आहेत. शुक्रवारी (दि.27) मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर (MCX Multi Commodity Exchange) आज सोन्याच्या दरासह चांदीचे दर देखील वधारले आहेत. MCX वर आज सोन्याच्या दरात 0.38 टक्के वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 0.24 टक्क्यांची तेजी पाहायला मिळत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिस्ड कॉल द्या अन् जणून घ्या सोन्याचे दर
तुम्हाला जर सोन्या चांदीचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही घरबसल्या हे काम करु शकता. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर (22 and 24 carat gold prices) जाणून घेण्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस़्ड कॉल (Missed call) करा. काही वेळात तुमच्या मोबाईल क्रमांकवार मौल्यवान धातूच्या किमतीबाबत मेसेज येईल. एवढेच नाही तर सोन्याच्या किमतीबाबत लेटेस्ट अपडेसाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाईटला देखील भेट देऊ शकता.
सोन्या चांदीचे दर
सोन्याच्या दरात आज 0.38 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दर 47,415 प्रति तोळावर पोहचले आहेत. तर चांदीमध्ये 0.24 टक्क्यांच्या वाढीनंतर दर 62,874 प्रति किलोवर पोहोचले आहेत.
सोने 50 हजाराचा टप्पा गाठणार
तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर लवकरच 50 हजाराचा टप्पा गाठेल. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी
(Investment) योग्य काळ आहे. सध्या दर तुलनेने कमी असल्याने गुंतवणूकदार यात गुंतवणूक
करु शकतात. आधीपासून सोन्यात गुंतवणूक करत असाल तर आता देखील होल्ड ठेवणे फायदेशीर ठरु शकेल.
Web Title : gold silver price today increased today 10 gram gold today rs 47415
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Congress | काँग्रेसच्या कार्यकारिणीत पुण्यातील 7 पदाधिकार्यांना संधी, रमेश बागवे शहराध्यक्षपदी कायम