मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. गेले काही दिवस झाले सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. दरम्यान आज पुन्हा सोन्या – चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. आज (शनिवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 48,250 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 67,100 रुपये पर्यंत पोहचली आहे.
आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान, आता सोन्या – चांदीच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,740 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,740 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,640 रुपये
आजचा चांदीचा दर – 67,100 रुपये (प्रति किलो)
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in maharashtra today on 9 april 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update