मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या सोनं-चांदी स्वस्त मिळत आहे. नववर्षाच्या सुरूवातीपासून सोन्या-चांदीच्या भावात घसरण दिसून येत आहे. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,250 रुपये पर्यंत कमी आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 62,400 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली. त्यामुळेचं सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी दिसून येत आहे. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भाव (Gold Silver Price Today) उतरताना दिसत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे.
दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तर, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. (Gold Silver Price Today)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,080 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये
आजचा चांदीचा भाव – 62,400 रुपये (प्रति किलो).
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 4 january 2022 know gold rates in mumbai, pune and nagpur sonya chandiche dar.